धरणगाव (प्रतिनिधी) मुन्नादेवी अँड.मंगलादेवी मल्टीपर्पज फाउंडेशन संचलित ज्योतीदेवी अन्नपूर्णा भंडारा प्रथमच वर्धापन दिनानिमित्त गरीब होतकरू व निराधार विद्यार्थ्यांना दुचाकी सायकल व निराधार व्यक्तींना सोलापुरी चादर वाटपाचा कार्यक्रम शनिवार दि. ११ डिसेंबर रोजी होणार आहे. यावेळी माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि माजी पालकमंत्री तथा जिल्हा बँकेचे अध्यक्ष गुलाबराव देवकर हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
प्रमुख मान्यवर म्हणून जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ, ध. न. पा. नगराध्यक्ष सुरेश सिताराम चौधरी, श्रीजी जिनिंग फॅक्टरीचे संचालक नयन शेठ गुजराथी, धरणगाव लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश सुरेश चौधरी, राष्ट्रीय काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डी.जी. पाटील, आदर्श माध्यमिक विद्यालयाचे चेअरमन सी. के. पाटील, समाज सेवक श्याम सिंहजी गौतम, जेडीसीसी बँकेचे अध्यक्ष गुलाबराव देवकर, सुद्धा शांती केंद्राचे संजय बिर्ला, महाकॉट असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप जैन, अ. भा. कार्यकारी सदस्य आर. एन. महाजन, उ. म. वि. सिनेट सदस्य डी. आर. पाटील, ध. न.पा. नगराध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, समाजसेवक अजय शेठ पगारिया, नाशिक विभागीय अध्यक्ष चंद्रशेखर राजपूत आदी उपस्थित राहणार आहेत.