धरणगाव (प्रतिनिधी) येथील कोरोनाची रुग्ण संख्या झपाट्याने वाढत असून त्यात जैन गल्ली हा कोरोनाचा हाँटस्पाट बनलेला दिसून येत आहे. त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी अभिजित राऊत व नगरपालिकेचे मुख्यधिकारी जनार्धन पवार यांनी पाहणी केली. तसेच नागरिकांच्या समस्याही जाणुन घेतल्या.
तसेच यावेळी असोशिएशनचे अध्यक्ष मिलिंद डहाळे, जैन समाजाचे उपाध्यक्ष प्रतिक जैन, सचिव श्रेयांस जैन यांचाशी चर्चा केली. तर डॉ. मिलिंद डहाळे वैद्यकिय सेवा, सुविधा व उपाय योजना या संर्दभात चर्चा केली. यावेळी जैन समाजाचे अध्यक्ष राहुल जैन, अक्षयशेठ मुथा, सौरभ डहाळे, राजेश डहाळे, सावन जैन आदी उपस्थित होते.