नाशिक (वृत्तसंस्था) विभागीय आयुक्त कार्यालय, नाशिक येथे 13 जून, 2022 रोजी दुपारी 12.00 वाजता विभागीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे, असे उपायुक्त (महसुल) गोरक्ष गाडीलकर यांनी शासकीय प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
ज्या नागरिकांना त्यांचे तक्रार अर्ज सादर करावयाचे असतील त्यांनी समक्ष बैठकीच्या दिवशी सादर करावेत. तसेच पोस्टाने कार्यालयात सादर करण्याचे आवाहनही उपायुक्त गाडीलकर यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.