जळगाव (प्रतिनिधी) वीज बिल भरण्याच्या नावाखाली डॉक्टर दाम्पत्याच्या खात्यातून ३ लाख ९८ हजार ९९९ रूपये परस्पर काढून फसवणूक केल्याप्रकरणी जळगाव सायबर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात अधिक असे की, भुसावळ शहरातील मल्टिस्पेशातील हॉस्पीटलचे संचालक डॉ. समीर खानापुरकर यांच्या मोबाईलवर २३ आणि २४ जानेवारी रोजी एक मॅसेज आला. त्यात ईलेक्ट्रिसीटी ऑफीसर रोहित असे नाव सांगून वीज बिल भरण्यासाठी त्यांना एक लिंक पाठविली. लिंक ओपन करून डॉक्टरांनी त्यांच्यासह त्यांच्या पत्नी यांच्या बँकेची सर्व माहिती दिली. समोरील रोहित नावाच्या व्यक्तीने दोघांच्या खात्यातून सुमारे ३ लाख ९८ हजार ९९९ रूपये परस्पर काढून घेतले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर डॉक्टरांनी सोमवारी २४ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता धाव घेवून रोहित नावाच्या व्यक्तीविरोधात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून जळगाव सायबर पोलीस ठाण्या अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक लिलाधर कानडे करीत आहे.