धरणगाव (प्रतिनिधी) येथील समस्त कुणबी पाटील समाज पंच मंडळाला समाजाचे संचालक किशोर सुकलाल पाटील यांच्याकडून स्पर्धा परीक्षेच्या पुस्तकांच्या खरेदीसाठी ३१,००० रुपयांचा धनादेश दिला.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, ३४ वर्षांपासून जगद्गुरू तुकाराम महाराज बिजनिमित अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह संपन्न होत असतो. समस्त कुणबी पाटील पंच मंडळाच्या वतीने नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले जात असतात. यामध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार हा देखील एक उल्लेखनीय उपक्रम आहे. तुकोबांच्या बिजनिमित हा कार्यक्रम पार पडत असतो, याच कार्यक्रमातून प्रेरणा घेऊन समाजाचे संचालक किशोर सुकलाल पाटील यांनी स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे या हेतूने पुस्तकांच्या खरेदीसाठी बीज सप्ताहाच्या आढावा बैठक प्रसंगी त्यांनी हा रुपये ३१,००० चा धनादेश पंच मंडळाकडे सुपूर्द केला. समस्त कुणबी पाटील पंच मंडळाच्या वतीने समाजातील सर्व घरांना एक याप्रमाणे जगद्गुरू तुकाराम महाराजांची गाथा स्नेहभेट स्वरूपात देण्यात आली. किशोर पाटील यांचा तुकोबांची गाथा देऊन सत्कार करण्यात आला तद्नंतर त्यांनी समाजाचे जेष्ट संचालक माधवराव पाटील यांच्याकडे ३१,००० रुपयांचा धनादेश सुपुर्द केला. याप्रसंगी किशोर पाटील यांचे सुपुत्र प्रविण पाटील यांच्या वतीने पुस्तक खरेदीसाठी अजून निधी लागत असेल तर तोही देण्याचा शब्द दिला.
या स्तुत्य उपक्रम प्रसंगी धनादेश देतांना किशोर सुकलाल पाटील व त्यांचे सुपुत्र प्रविण पाटील यांच्याकडून धनादेश स्विकार करतांना समाजाचे जेष्ठ संचालक माधवराव पाटील, समाजाचे अध्यक्ष भिमराज पाटील, उपाध्यक्ष दिलीपबापू पाटील, सचिव महेश्वर पाटील, खजिनदार लक्ष्मण पाटील, सहसचिव दिनेश पाटील, सदस्य चुडामण पाटील, कैलास पाटील, राजेंद्र पाटील, दत्तू पाटील, मोहन पाटील, किशोर पाटील, गणेश पाटील, अशोक पाटील, वाल्मिक पाटील, मंगेश पाटील, परशुराम पाटील, आनंद पाटील, जितेंद्र पाटील यांच्यासह वना पाटील, मुरलिधर पाटील, वसंत पाटील, रविंद्र पाटील, मधुकर पाटील, नथु पाटील, सागर पाटील, प्रकाश पाटील, शरद पाटील, हेमेंद्र पाटील, पंकज पाटील, राहुल पाटील, समाधान पाटील, गोपाल पाटील, मुन्ना पाटील, दादू पाटील, दिपक पाटील, डिगंबर पाटील, हर्षल पाटील, जयेश पाटील, निलेश पाटील, सागर पाटील, भूषण पाटील आदी समाज बांधव तसेच शिपाई अशोक झुंजारराव उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व दात्यांचे आभार लक्ष्मण पाटील यांनी मानले.
















