TheClearNews.Com
Saturday, April 11, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

फडणवीसांवर स्वप्नात देखील विश्वास ठेवू नका ; अनिल गोटेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र !

The Clear News Desk by The Clear News Desk
July 3, 2022
in राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

धुळे (प्रतिनिधी) नवनियुक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धुळ्याचे माजी आमदार अनिल गोटे यांनी एक पत्र लिहित शिंदेंना वडिलकीचा सल्ला दिला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यावर स्वप्नात देखील विश्वास ठेवू नका, असा सल्ला गोटे यांनी नूतन मुख्यमंत्री शिंदेंना दिला आहे.

जाणून घ्या…अनिल गोटे यांच्या पत्रात नेमकं म्हटलंय ?

READ ALSO

आ. मंगेश चव्हाण यांच्या जबाबदारीतील केरळमधील वट्टीयारकाव मतदारसंघात केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा यांच्या उपस्थितीत भव्य रॅली व रोड शो संपन्न

शिवसेना शिंदे गटातील तीन आमदार भाजपची उमेदवारी करणार

“माननीय एकनाथ शिंदे साहेब,

आपली मुख्यमंत्री पदावर निवड झाल्याबद्दल मी यापूर्वीच हृदयापासून अभिनंदन केले. मोगँबो खुश हुआ. तुमच्यापेक्षा जास्त पावसाळे अनुभवलेत, म्हणून वडीलकीचा सल्ला देतो. मानला तर आपलाच फायदा होईल. किमान फसवणूक व नंतर पश्चाताप होणार नाही. ही एक लाख टक्के खात्री देतो.

देवेंद्र गंगाधर फडणवीस यांच्यावर स्वप्नात देखील विश्वास ठेवू नका ! मी कुठलाही स्वार्थ, काडी ईतकी लाभाची अपेक्षा ठेवली नाही. या नीच, हलकट, पाताळयंत्री, दगलबाज, कपटी, खोटे बोलण्याचे अनन्यसाधारण अंगभूत गुण असलेल्या माणसावर श्रद्धा ठेवली. विश्वास ठेवला. हा माणूस चुकून सुध्दा दगलबाजी करणार नाही, असे मला वाटले होते.

मी त्यावेळी भाजपचा आमदार होतो. ते मुख्यमंत्री होते. रात्री दहा वाजेपासून दोन वाजे पर्यंत सलग चार तास चर्चा केली. मी स्वतःहून म्हणालो साहेब तुम्हाला काही अडचण असेल तर मोकळेपणाने सांगा. मी स्वतःहून बाजूला होतो. हा हलकट लबाड म्हणतो कसा ‘गोटेसाहेब तुम्ही पक्षाचे अॅसेट आहात. तुम्हाला मी शब्द नव्हे वचन देतो. उद्याच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतरच्या पत्रकार परिषदेत जाहीर करतो.’

ठरल्याप्रमाणे पत्रकार परिषदेत जाहीर केले. मी स्वतः भेटून आभार मानले, मला शुभेच्छा दिल्या. कुठलीही सभ्य सुसंकृत खानदानी व्यक्ती एखाद्या व्यक्तीने एवढे सर्व सांगितल्यावर अविश्वास दर्शवेल कसा ? मी प्रामाणिकपणे व एका निष्ठेने वागत आलो. स्वर्गीय वसंतराव भागवत, स्वर्गीय रामभाऊ गोडबोले अशा ऋषीतुल्य व्यक्तींचे संस्कार असल्याने व त्यांच्या देवरदुर्लभ सहवासामुळे तसेच दिलेला शब्द प्राण गेला तरी बेहत्तर पण तसूभरही मागे न हटणाऱ्या माननीय नितीन गडकरी साहेबांनी अत्यंत संकटकाळी दिलेल्या आधाराच्या पाश्वर्वभूमीवर माझ्या मनात शंका येवूच कशी शकेल ?

स्वर्गीय नानासाहेब उत्तमरावांनी तर सलग तीस वर्ष पुत्रवत प्रेम केले. स्वर्गीय प्रमोद महाजन, स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांनी धाकट्या भावाप्रमाणे सांभाळले. कधी शब्द खाली पडू दिला नाही. कधी तर तोंडातून शब्द उच्चारण्यापूर्वीच मनकवडे असल्याप्रमाणे ओळखत !. स्वर्गीय बाळासाहेबांना लहर आली की, माझ्या दोन मुलांसह भेटायला बोलवत असत. अनेकदा आग्रहपूर्वक बरोबर जेवायला बसवत. माननीय उद्धवजी साक्षीदार आहेत.

मी एक लहान कार्यकर्ता ! मी त्यांना मदत तरी काय करणार ? साहेब तर, जाम खूष असत. अनेकदा प्रेमाने रागवत! किती दिवस अस कफल्लक राहशील? शिवसेनेत ये. तुझ्या आयुष्याचं सोनं करुन टाकतो. मला बाकी काही नकोच होतं. प्रेमाची भूक भागविली जात होती. मणी नावाचे एक पी. ए . होते. साहेबांनी त्यांना सांगीतलं आत्ताच्या आत्ता पत्रकारांना बोलवा “आज या गोट्याला, सोडायच नाही” असे म्हणाले.

पण साहेबांच्या प्रेमाशिवाय मला काही नकोच होतं. माननीय मनोहर जोशी सर यातील काही प्रसंगाचे साक्षीदार आहेत. तेलगी प्रकरणातून तब्बल चार वर्षानंतर बाहेर आलो. पहिला फोन कै. गोपीनाथ मुंडे साहेबांचा! दुसरा बाळासाहेबांचा, तिसरा नितीनजींचा ! साहेबांनी तर सौ. हेमा, मुलगा तेजस यांना आवर्जून जेवायला बोलवल !

मी हे सगळं यासाठी सांगितल की, आभाळाएवढ्या उंच उंच व्यक्तीनी मला दिलेला विश्वास, प्रेम आणि आपुलकी कुठे ? आणि फडणविसांची दगलबाजी कुठे ? आजही मनोहर जोशी सरांना विचारा सर्व संधी उपलब्ध असतांना कधी एका तांबड्या पैशाची मदतीची अपेक्षा केली का ?

देवेंद्र गंगाधर फडणवीस यांना माझा काडीचाही त्रास नसतांना त्यांच्याइतपत हलकट, नीच, लबाड, धोकेबाज व भ्रष्ट दुराचारी मित्रांचा आत्मा संतुष्ट करण्यासाठी माझ्या सारख्या धनगर समाजातील कार्यकत्याचा छळ केला. मनाचा तका क्षुद्र की आपल्याकडून अनवधानाने का होईना पण अन्याय झाला, हे कबूल करण्याचा प्रामाणिकपणा त्यांच्याकडे नाही. अशा राक्षसी वृत्तीच्या व्यक्तीपासून सावध रहावे अशी मनोमन भावना असल्याने आलेला अनुभव शेअर केला. परमेश्वर अशा पशुतुल्य राक्षसी संकटापासून आपले रक्षण करो. हीच ईश्वर चरणी प्रार्थना !”

मानलात तर आपला मित्र,

अनिल गोटे

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #anilgote #updates #topnews#fadanvis #eknathshinde

Related Posts

राजकीय

आ. मंगेश चव्हाण यांच्या जबाबदारीतील केरळमधील वट्टीयारकाव मतदारसंघात केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा यांच्या उपस्थितीत भव्य रॅली व रोड शो संपन्न

April 4, 2026
जळगाव

शिवसेना शिंदे गटातील तीन आमदार भाजपची उमेदवारी करणार

April 4, 2026
जळगाव

भाजप-शिवसेनेचे ५ स्वीकृत नगरसेवकांचे अर्ज ठरले

March 28, 2026
राजकीय

आमदार एकनाथराव खडसे यांचे मंत्री गिरीश महाजन यांना चोख प्रत्युत्तर; ६७ तारांकित प्रश्नांसह विविध आयुधांच्या माध्यमातून मांडला जनहिताचा अजेंडा!

March 27, 2026
जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
Next Post

संतापजनक : काकानेच केला पुतणी, पुतण्यावर लैंगिक अत्याचार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

“एमपीएससी’ पूर्व परीक्षांच्या नव्या तारखा जाहीर

January 11, 2021

गंधमुक्तीचा कार्यक्रम आटोपून घरी परताना कार पुलाखाली कोसळली ; अमळनेरचे तीन जण ठार !

June 11, 2023

बॉलीवूडला संपवण्याचे किंवा इतरत्र हलवण्याचे प्रयत्न सुरू : उद्धव ठाकरे

October 15, 2020

सामाजिक न्याय विभागाच्या योजनांचा एलईडी चित्ररथातून जिल्ह्यात जागर; पालकमंत्र्यांच्या हस्ते झेंडा दाखवून झाला प्रारंभ !

September 26, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group