TheClearNews.Com
Monday, May 18, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बिहारमध्ये तरी तिकीटांची कापाकूप करु नका – खडसे

फडणवीसांच्या बारभाई कारस्थानावर नाथाभाऊ लिहीणार पुस्तक

The Clear News Desk by The Clear News Desk
September 11, 2020
in मुक्ताईनगर, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

मुक्ताईनगर प्रतिनिधी । माजी मुख्यमंत्री तथा सध्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भाजपाच्या बिहार प्रभारीपदी निवड झाली आहे. याबद्दल फडणवीसांना शुभेच्छा मात्र आता तेथे जाऊन तिकीटांची कापाकूप करु नका, असा टोला एकनाथराव खडसे यांनी लगावला. ते सुनील नेवे लिखीत ‘जनसेवेचा मानबिंदू’ पुस्तक प्रकाशन सोहळ्याप्रसंगी बोलत होते. तसेच लवकरच ‘नानाजी फडणवीसांचे बारभाई कारस्थान’ यावर पुस्तक लिहीणार असल्याचे नाथाभाऊ यांनी सांगितले.

पुढे खडसे म्हणाले की, आमचा मुख्यमंत्री ड्रायक्लिनर होता, सरकारमध्ये कोणावरही आरोप झाले की लगेच क्लिनचिट द्यायचा, मी निर्दोष असताना क्लिन चिट दिली नाही. देवेंद्र फडणविस दमानिया यांना वेळ देत होते, पण मला नाही. मात्र नाथाभाऊ अन्याय सहन करणारा नाही, मी स्वस्थ बसणारा नाही. पक्षाच्या नेत्याकडून न्याय मिळत नाही तोपर्यंत भांडणार, असल्याचेही ते म्हणाले. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, रावसाहेब दानवे, माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार, विधानसभेचे माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी या पुस्तकाचे ऑनलाईन प्रकाशन केले.

READ ALSO

भरधाव डंपरच्या धडकेत दोन आदिवासी युवक ठार

अविश्वासाआधीच सुनिल महाजनांचा डाव; कृऊबा सभापतीपदाचा राजीनामा

यावेळी चंद्रपूरहून मुनगंटीवार म्हणाले की, कार्यकर्त्यांवर भावाप्रमाणे प्रेम करणारा नेता म्हणून खडसेंची ओळख आहे. विरोधी पक्षात असतांना त्यांनी तत्कालीन सरकारवर केलेले आरोप टीका हे त्यांचे शब्द नव्हते. तर बाण होते. त्यांच्या अभ्यासपूर्ण भाषणामुळे त्यांन अनेक जनहिताचे निर्णय घेण्यास त्या त्या सरकारला भाग पाडले. ते विरोधी पक्षात असतांना अनेकदा त्यांच्या निवासस्थानी बैठका होत. पण प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांच्या घरी गेलो असता ते खुर्चीवरुन उठून मला त्या खुर्चीवर जागा देत एवढे ते मोठे आहेत. ना कुठला अहंकार ना गर्व असे त्यांचे व्यक्तीमत्व. रावसाहेब दानवे व हरिभाऊ बागडे यांनीही मनोगतात खडसेंनी पक्षासाठी दिलेल्या योगदानाचा गौरवपूर्ण उल्लेख केला.

प्रकाशन सोहळ्यात पुढे एकनाथराव खडसे म्हणाले की, अनेक लोक सांगतात, नाथाभाऊवर पक्ष अन्याय करतोय, त्यांचं काहीतरी अडकलं असेल म्हणून पक्ष सोडत नाही, पण स्पष्ट करतो माझं काही अडकलेलं नाही, माझा जीव पार्टी सोबत लागला आहे. म्हणून सहन करतोय. पर्याय भरपूर आहेत, असे सांगून त्यांनी बंडाचा इशारा दिला. आमचा मुख्यमंत्री ड्रायक्लिनर होता. सरकारमध्ये कोणावरही आरोप झाले की लगेच क्लिनचिट द्यायचा. मात्र मी निर्दोष असताना क्लिन चिट दिली नाही. नितीन गडकरी, रावसाहेब दानवे, सुधीर मुनगंटीवार, हरिभाऊ बागडे हे आमचे नेते शुभेच्छा देताना म्हणतात, नाथाभाऊचे कार्य, योगदान मोठे आहे, नाथाभाऊ चांगला होता तर पक्षाने तिकीट का दिले नाही. असो मुंडे आज हयात असते तर महाराष्ट्राचे चित्र वेगळे असते. गोपीनाथ आणि एकनाथ एक आहेत अशी गोपीनाथ मुंडे यांची भूमिका होती असेही ते म्हणाले.

यावेळी महानंदच्या अध्यक्षा मंदाकिनी खडसे, खासदार रक्षा खडसे, भाजप जिल्हाध्यक्ष तथा आमदार सुरेश भोळे, जिल्हा बॅँक अध्यक्षा ऍड. रोहिणी खडसे-खेवलकर, आमदार संजय सावकारे, महामंडलेश्वर जनार्दन महाराज, महंत प्रभाकरशास्त्री महाराज, स्वामी शास्त्री भक्तीप्रकाश दास, माजी आमदार गुरुमुख जगवाणी, माजी आमदार चैनसुख संचेती, प्रभारी सभापती विद्या पाटील, नगराध्यक्षा नजमा तडवी, जि.प.अध्यक्षा रंजना पाटील, माजी जि.प.अध्यक्ष अशोक कांडेलकर, उपाध्यक्ष लालचंद पाटील, जि.प.शिक्षण व आरोग्य सभापती छोटू पाटील, सावदा नगराध्यक्षा अनिता येवले, आरपीआय नेते रमेश मकासरे, अथर्व पब्लिकेशनचे सुदाम माळी, माजी जि.प.अध्यक्ष दिलीप खोडपे, बााजर समिती सभापती निवृत्ती पाटील, मुक्ताईनगर पं.स.सभापती विद्या पाटील आदी उपस्थित होते. प्रास्ताविक प्रा.नेवे, सूत्रसंचालन वैशाली कोल्हे यांनी तर आभार सरपंच मनीषा देशमुख यांनी मानले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

भरधाव डंपरच्या धडकेत दोन आदिवासी युवक ठार

May 15, 2026
जळगाव

अविश्वासाआधीच सुनिल महाजनांचा डाव; कृऊबा सभापतीपदाचा राजीनामा

May 9, 2026
भुसावळ

जात प्रमाणपत्र रद्द; भुसावळच्या नगराध्यक्षा भंगाळे अपात्र, राजकारणात खळबळ

May 6, 2026
जळगाव

जळगाव बाजार समितीत राजकीय भूकंप! सभापती सुनिल महाजनांविरुद्ध १३ संचालकांचा अविश्वास प्रस्ताव

April 28, 2026
जळगाव

‘फायरब्रॅण्ड’ गुलाबराव पाटील यांच्या मंत्रीपदाची तटबंदी पक्षश्रेष्ठींनी केली मजबूत

April 27, 2026
राजकीय

आ. मंगेश चव्हाण यांच्या जबाबदारीतील केरळमधील वट्टीयारकाव मतदारसंघात केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा यांच्या उपस्थितीत भव्य रॅली व रोड शो संपन्न

April 4, 2026
Next Post

जिल्ह्यात ऑक्सिजनची कृतीम टंचाई करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई - पालकमंत्री

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

चोरीच्या दुचाकीसह दोन आरोपींना एमआयडीसी पोलिसांनी केली अटक

January 16, 2025

Today Horoscope : आजचे राशिभविष्य 30 जानेवारी 2025 !

January 30, 2025

जयश्रीताई तुम आगे बढो म्हणत… महिलांकडून जयश्रीताईंना जोरदार प्रतिसाद !

November 14, 2024

जळगावातील कुविख्यात गुन्हेगार ‘आझाद’ स्थानबद्ध ; नाशिक कारागृहात रवानगी !

September 22, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group