जळगाव (प्रतिनिधी) आज भारतीय जनता पार्टीतर्फे तालुका कार्यालयात डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
त्याप्रसंगी जिल्हाउपाध्यक्ष पी.सी.आबा पाटील, जेष्ठ नेते शिरिषआप्पा बयस, ओबीसी जिल्हाध्यक्ष अँड. संजय महाजन, तालुकाध्यक्ष जिजाबराव पाटील, अँड. वसंतराव भोलाने, प्रकाश सोनवणे, ता. सरचिटणीस सुनील पाटील, शहराध्यक्ष दिलीप महाजन, गटनेते कैलास माळी, नगरसेवक भालचंद्र माळी, सुनील चौधरी, जुलाल भोई, राजू महाजन, सचिन पाटील, सरचिटणीस कन्हैया रायपूरकर, विक्की महाजन, इत्यादी कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.