धरणगाव (प्रतिनिधी) पालकमंत्री पदाच्या कार्यकाळात संघाचे सरसंघचालक डॉ. हेडगेवारांच्या नावाने धरणगाव तालुक्यात बहुदा देशात पहिलीच ग्रामपंचायत स्थापन झाली असून त्याचा मला असल्याचा सार्थ अभिमान आहे. डॉ. हेडगेवारांनी दिलेला ‘विकासाचा मंत्र ’ हा लोककल्याणासाठी असून डॉ. हेडगेवारांच्या स्वप्नातील आदर्श ग्रामपंचायतीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील असून डॉ. हेडगेवार ग्रामपंचायतीसाठी निधीची कमतरता भासू देणार नाही, असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालक मंत्री तथा शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील यांनी केले. ते धरणगाव येथे नव्याने मंजूर झालेल्या डॉ. हेगडेवार ग्राम पंचातीच्या नागरिकांना ७/१२ चे उतारेवाटप व शेतकरी आत्महत्या शेतकऱ्यांच्या वारसांना धनादेश वाटपा प्रसंगी केले. तर डॉ. हेगडेवार यांनी देशासाठी व समाजासाठी निस्वार्थ केले कार्य हे कौतुकास्पद असून समाजाला दिशादर्शक असल्याचे मत कार्यक्रमाचे अध्यक्ष तालुका संघचालक मोहन चौधरी यांनी व्यक्त केले.
आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबांना पालकमंत्र्यांच्या हस्ते धनादेश वाटप
या प्रसंगी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते जळगाव तालुक्यातील चोरगाव, पाळधी बु. व धरणगाव येथिल ३ आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी एक लाख रूपये मदतीचा धनादेश प्रदान करण्यात आला. तसेच पशुहानी व वादळ व अतिरुष्टीत नुकसान झालेल्या रेल येथिल ४ व्यक्तीना १ लक्ष ६० हजाराचे शासकीय अर्थसहाय्य प्रदान करण्यात आले. यावेळी ना. गुलाबराव पाटील यांनी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना धीर दिला. तर नव्याने स्थापन झालेल्या डॉ. हेगडेवार ग्रामपंचातीच्या नागरिकांना ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते सुमारे २०-२५ ७/१२ चे उतारे वाटप करण्यात आले.
यांची होती उपस्थिती
या प्रसंगी भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष डॉ. व्ही. आर. तिवारी, पश्चिम क्षेत्रकार्यवाहक (संघ) बाळासाहेब चौधरी, तालुका संघचालक मोहन चौधरी, भाजप ज्येष्ठ नेते सुभाषअण्णा पाटील, ओबीसी आघाडीचे जिल्हाध्यक्ष अॅड संजय महाजन, पी.सी. आबा पाटील, नायब तहसीलदार लक्ष्मण सातपुते, गटविकास सुशांत पाटील, मा. जि. प. सदस्य माधुरीताई अत्तरदे, दत्तात्रय चौधरी, प्रा. डी.आर. पाटील, डॉ. किशोर भावे, गरसेवक पप्पू भावे, विलास महाजन, कैलास माळी, धीरेंद्र पुरभे, शेखर अत्तरदे, भानुदास विसावे, श्रीकृष्ण बारकू पाटील, अशोक महाजन, मोहन पाटील, वैभव बोरसे, राजेंद्र गांगुर्डे, गणेश पवार, बाविस्कर काका, अनिल पाटील, अनिल देशमाने, मंदार चौधरी, मनोज ठाकरे, सुधर्मा पाटील, सी.के. पाटील सर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक समाधान मोरे, सूत्रसंचालन सामाजिक कार्यकर्ते मंदार चौधरी यांनी केले. प्रास्ताविकात डॉ. हेगडेवार ग्रामपंचायत स्थापनेची पार्श्वभूमी विषद करून त्यांच्या नावाने ग्रामपंचायत स्थापन केल्याबद्दल पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे आभार व्यक्त केले. तर आभार मनोज ठाकरे सर यांनी मानले. तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ग्रामसेवक प्रशांत लिंगायत, हरीश विसावे, कैलास पाटील यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.