जळगाव (प्रतिनिधी) जळगाव शहर व जिल्हा काँग्रेसतर्फे आज राहुल गांधी यांचा जन्मदिवस “संकल्प दिवस” म्हणून साजरा करण्यात आला.
यानिमित्ताने काँग्रेस भवनात दुपारी २ वाजता खा. राहुल गांधींना शुभेच्छा देण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी राहुल जी को लाना है देश को बचाना है, राहुल जी को लाना है किसान को बचाना है, राहुल जी को लाना है महंगाई को हटाना है, राहुल जी को लाना है बेरोजगारी हटाना है, अब जनता ने ठाणा है राहुल जी को लाना हैl अशा घोषणा देऊन राहुल गांधींना शुभेच्छा दिल्या.वाढदिवसाचे औचित्य साधत मोदी सरकार विविध आघाड्यांवर फेल झाल्याने त्याचा निषेध करीत आंदोलन केले. आंदोलन प्रसंगी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अँड. संदीप पाटील यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी तिन्ही काळ्या कायद्यांच्या प्रतींची होळी केली.
देशाला हेकेखोरपणाने मरणाच्या खाईत लोटण्याचे काम केंद्रातील मोदी सरकारने केले. गंगानदीत मृतदेह तरंगतानांचे भयावह दृश्य जगाने पाहिले पण भाजप सरकारने त्यातूनही काहीच बोध घेतला नाही.अशा या मोदी सरकारचा निषेध करण्यात आला यावेळी खायला नाही तेल,मोदी सरकार फेल,भिडविले गगनाला भाव-मोदी सरकार त्याचे नाव ,तेल गेले तूप गेले हाती आले धुपाटणे..! नरेंद्र मोदी किसान विरोधी, काळा कायदा मोदींचा, शेतकऱ्यांचा बर्बादीचा..,मेक इन इंडिया यात तेलाशिवाय स्वयंपाक कसा करावा..अशा या केंद्र सरकार च्या निषेधार्थ घोषणा दिल्यात.
यावेळी माजी जिल्हाध्यक्ष उदय पाटील, इंटक जिल्हा अध्यक्ष भगतसिंग पाटील, अल्पसंख्यांक जिल्हा अध्यक्ष मुन्नावर खान, जिल्हा सरचिटणीस अजबराव पाटील, जिल्हा उपाध्यक्ष शाम तायडे, राजस कोतवाल, जमील शेख, मनोज सोनवणे, देवेंद्र मराठे, मुजीब पटेल, अमजद पठाण, मनोज चौधरी, प्रदीप सोनवणे, जगदीश गाढे, जगपालसिंग गिर, ज्ञानेश्वर कोळी, दिपक सोनवणे, योगिता शुक्ला, अमीना तडवी, विष्णू घोडेस्वार, मालोजीराव पाटील, विजय वाणी, जाकीर बागवान, परवेज पठाण व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
















