चोपडा (प्रतिनिधी) शहरालगत असलेल्या हॉटेल इंडिया समोर आयशर व मोटरसायकलची सामोरा समोर धडक झाली. त्यात दोन जण गंभीर झाले आहेत.
सविस्तर असे की, आयशर गाडी क्रमांक (एम.एच. 04 एल 6891) ही चोपडाकडून धरणगावकडे जात होती. यावेळी धरणगावकडून येणारी मोटरसायकल क्रमांक (एम.एच.19 बी.डी.7538) ला हॉटेल इंडियाचा समोर आयशरने समोरून धडक दिली. यात मोटरसायकल चालक बिरजु भटा बारेला (35, रा.साळवा ता. धरणगाव) यांच्या डोक्याला जबर मार लागला. त्याची प्रकृती गंभीर असल्याचे कळते. मोटारसायकलवरील दुसरा राजाराम कण्हश्या बारेला (वय 33, रा. पांझऱ्या वरला, मध्यप्रदेश) याचाही डोक्याला मार लागल्याने तो देखील गंभीर जखमी झाला आहे.
दोघांवर प्राथमिक उपचार करून त्यांना जळगाव हलविले असल्याचे उपजिल्हा रुग्णालयातून माहिती मिळाली. राजाराम बारेला याची मुलगी येथील महात्मा गांधी महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. तिला भेटून ते घरी जात होते, असेही त्यांच्या नातेवाईकानी सांगितले. तसेच बिरजु बारेला व राजाराम बारेला हे दोघे साला मेहुण्याचे नाते असल्याचे समजते. याबाबत चोपडा शहर पोलीस स्टेशनचे काही कर्मचारी तात्काळ हजर झाले होते. यावेळी बीआरएसचे कार्यकर्ते दीपक पाटील यांनी जखमींना मदत केली.
















