
पाचोरा, (प्रतिनिधी) : शहरातील भडगाव रोडवरील महाराष्ट्र ग्रामीण कामासाठी वृद्ध शेतकऱ्याने काढली. मात्र, वृद्ध शेतकऱ्याची दिशाभूल करत चोरट्यांनी २ लाख १५ हजार रुपये चोरुन नेल्याची घटना ९ ऑक्टोबरला भरदुपारी घडली. क्षणार्धात दोन्ही चोरटे दुचाकीवरुन पसार झालेत.
एरंडोल तालुक्यातील उत्राण येथील प्रकाश जिवराम पाटील यांनी महाराष्ट्र ग्रामीण बँकेतून शेतीसाठी लागणारे बियाणे खरेदी, शेती कामाची मजुरी वाटप व इतर खर्चासाठी ९ ऑक्टोबरला दुपारी १ वाजेच्या सुमारास २ लाखांची रोकड काढली. ही रोकड व त्यांच्याजवळ आधीच १५ हजार रुपये होते. असे २ लाख १५ हजार रुपये प्रकाश पाटील यांनी पिशवीत ठेवले. रोकड घेऊन ते त्यांच्या दुचाकीच्या डिक्कीत ठेवत असतानाच त्यांच्या मागून आलेल्या अज्ञात दोघा व्यक्तींनी महाराष्ट्र ग्रामीण बँक
दुचाकी (मोपेड) मधील डिक्कीतील २ लाख १५ हजारांची पिशवी घेऊन घटनास्थळावरुन सिनेस्टाईल पोबारा केला. प्रकाश पाटील यांनी मागे वळून पाहिले असता क्षणार्धात चोरटे पसार झाले होते. घटनेची माहिती मिळताच पो.नि. राहुलकुमार पवार, पो.उ.नि. कृष्णा घायाळ, जितेंद्र पाटील, पो.हे.कॉ. राहुल शिंपी, पो. कॉ. योगेश पाटील यांनी घटनास्थळी दाखल झाले. महाराष्ट्र ग्रामीण बँके परिसरातील सीसीटीव्हीमध्ये चोरटे कैद झाले आहेत. सीसीटीव्हीच्या आधारे चोरट्यांचा पोलीस शोध घेत आहेत. या प्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात प्रकाश पाटील यांच्या फिर्यादीवरून चोरीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तपास पो.नि. राहुलकुमार पवार यांच्या मार्गदर्शनात पो.कॉ. गजानन देशमुख करत आहेत.
















