धरणगाव (प्रतिनिधी) पत्रकारांसाठी राष्ट्रीय पातळीवर काम करणारी व्हॉइस ऑफ मीडिया या संघटनेच्या धरणगाव तालुका कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. तालुकाध्यक्षपदी भगीरथ माळी तर कार्याध्यक्षपदी जितेंद्र महाजन यांची निवड करण्यात आली आहे.
व्हॉइस ऑफ मीडियाच्या उपाध्यक्षपदी विलास झवर, डी.एस.पाटील तर सचिवपदी बी.आर.महाजन सहसचिव ए.के.पाटील, संघटक विजय शुक्ला, सहसंघटक संतोष पांडे, सहसंघटक बाबूलाल बडगुजर, प्रसिद्धी प्रमुख कल्पेश महाजन यांची तर सदस्यपदी दीपक झवर व राजेंद्र बोरसे यांची निवड करण्यात आली आहे. निवड झालेल्या कार्यकारिणीचे अभिनंदन जिल्हाध्यक्ष मिलिंद टोके, राष्ट्रीय उपाध्यक्ष सुरेश उज्जेनवाल, कार्याध्यक्ष विकास भदाणे, ज्येष्ठ पत्रकार भरत चौधरी, डिजिटल विंगचे जिल्हाध्यक्ष विजय वाघमारे यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांनी केले आहे.