धरणगाव (प्रतिनिधी) येथील श्री महावीर अर्बन को ऑप क्रेडिट सोसा.लिमिटेड पतसंस्थेची निवडणूक बिनविरोध झाली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून धरणगावचे सहाय्यक निबंधकांनी काम पाहिले.
महावीर पतसंस्थेत सर्वसाधारण गटातून डॉ. मिलिंद डहाळे, डॉ. अरुण कुलकर्णी, अजयशेठ पगारीया, अरविंद ऊर्फ राजू ओस्तवाल, संजय ओस्तवाल, नितीनशेठ नगरिया, महिला गटातून मंदाकिनीताई जाधव, मंगलाताई पाटील, इतर मागास प्रवर्गमधून अजय माळी, अनुसूचित जाती जमातीमधून सुधाकर विसावे, भटक्या विमुक्त जमातीमधून कैलास लोहार यांची २०२२ ते २०२७ या कालावधीसाठी बिनविरोध निवड झाली. बिनविरोध निवडून आलेल्या सर्व संचालकांचे स्वागत व सत्कार पतसंस्थेचे व्यवस्थापक राजू भाटिया यांनी केले.