जळगाव (प्रतिनिधी) उत्तर महाराष्ट्र माथाडी इतर श्रमजीवी असंरक्षित व असंघटीत कामगार संघटना जिल्हाध्यक्षपदी संदीप प्रकाश मांडोळे (रा. रामेश्वर कॉलनी, जळगाव) यांची निवड करण्यात आली आहे. संघटनेच्या वार्षिक बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
संघटना जिल्ह्यामधील माथाडी कामगार व इतर श्रमजीवी कामगारांबाबत विविध स्तरावर समस्या मांडण्याबाबत प्रयत्नशिल आहे. संघटनेचे अध्यक्ष अँड. जमील देशपांडे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले.
नियुक्तीबद्दल संघटनेचे उपाध्यक्ष सुनील महारू माळी, संजय प्रभाकर चांदेलकर, गोपाळ माळी, सुनील सुकलाल महाजन, भगवान वाणी, रामकृष्ण जावळे, बळीराम, बळीराम भाऊ यांनी अभिनंदन केले आहे.