कजगाव ता. भडगाव (प्रतिनिधी) येथून जवळच असलेल्या घुसर्डी ता. पाचोरा येथे केळी लागवडीसाठी पावटी पाडत असतांना विजेचा शॉक लागून एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना दि. ८ रोजी घडली. विकास धर्मा निकुंभ (वय २३,रा. घुसर्डी, ता.पाचोरा) असे या मृत तरुणाचे नाव आहे.
शेतकरी विकास हा काका राजेंद्र निकुंभ चुलतभाऊ साई व यश निकुंभ हे सारे शेतात केळी लागवडीसाठी पावटी पाडण्याचे काम करत होते. यावेळी विजेचा शॉक लागल्यामुळे विकास धर्मा निकुंभ बेशुद्ध पडले सदर प्रकार काका व चुलत भावाच्या लक्षात येताच त्यास तात्काळ जगाव येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तपासले असता ते मृत झाल्याचे सांगितले.विकासच्या पश्चात आई, वडील, दोन भाऊ, काका, चुलत भाऊ, असा परीवार आहे.
















