TheClearNews.Com
Wednesday, September 2, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

कारखान्यांमध्ये ४७ लाखांची वीजचोरी; दोन प्रकरणांत तिघांवर गुन्हा दाखल

vijay waghmare by vijay waghmare
September 1, 2026
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

नंदुरबार (प्रतिनिधी) – घुली परिसरात ​​ दोन ​​​कारखान्यांमध्ये ​​तब्बल ४७​ लाखांची वीजचोरी ​झाल्याचा धक्कादायक प्रकार महावितरणच्या धडक कारवाईत उघडकीस आला आहे. या प्रकरणी दोन वेगवेगळ्या प्रकरणांत तीन जणांवर नंदुरबारच्या उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
​ घुली शिवारात खुशबु ए. जैन यांच्या ​​ॲल्युमिनियम पावडर कोटिंग ​कारखान्यात मेसर्स लाब्धी इंटर नावाने वीजजोडणी असून, वापरकर्ता प्रकाश अशोक जैन आहे. महावितरणच्या नंदुरबार ग्रामीण-2 कक्षाचे सहायक अभियंता विनोदकुमार आगरे यांना या कारखान्यात वीजचोरी होत असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली. त्यानंतर 25 ऑगस्ट 2026 रोजी संध्याकाळी नंदुरबार विभागाचे कार्यकारी अभियंता अतुल गायधनी, नंदुरबार ग्रामीण-1 उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता विनोद काळे, सहायक अभियंता विनोदकुमार आगरे, सहायक अभियंता राकेश चौधरी, बाह्यस्रोत तंत्रज्ञ चेतन भदाणे यांनी सदर ठिकाणी पाहणी केली. विद्युत संच मांडणी तपासली असता ग्राहकाचा वीज वापर व त्यास येणारे वीजबिल यात तफावत दिसून आली. रोहित्रावरून एक केबल मीटरला जोडली होती तर उर्वरित​ 3 केबल मीटरला न जोडता थेट अनेक विद्युत उपकरणे जोडलेली असल्याचे आढळले. या उपकरणांद्वारे 115 एचपी (85.79 किलोवॅट) इतका वीजभार​​विद्युतभारित करून वीजचोरी होत होती. या ग्राहकाने अनधिकृतरीत्या 2 लाख 13 हजार 692 युनिट​ वीज वापरून 41 लाख 92 हजार 930 रुपयांची​ वीजचोरी केली. वीजचोरीच्या रकमेसह 17 लाख 70 हजार रुपये तडजोड रक्कम असे एकूण 59 लाख 62 हजार 930 रकमेचे बिल भरण्यास वापरकर्ता प्रकाश अशोक जैन याने टाळाटाळ केली. त्यामुळे सहायक अभियंता आगरे यांच्या फिर्यादीवरून खुशबु ए. जैन व प्रकाश अशोक जैन या दोघांवर भारतीय विद्युत कायद्याच्या कलम 135 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
​ याच पथकाने याच परिसरातील मेसर्स दक्ष इंटर (प्रो.आरती दीपक जैन, वापरकर्ता प्रकाश अशोक जैन) या ॲल्युमिनियम बफिंग मशीनच्या कारखान्यातही तपासणी केली. विद्युत संच मांडणी तपासली असता ग्राहकाचा वीज वापर व त्यास येणारे ​वीजबिल यात तफावत दिसून आली. या ठिकाणी रोहित्रावरून एक केबल मीटरला जोडली होती तर विद्युत मीटरच्या इनकमिंग टर्मिनलला तीन केबल जोडून मीटर बायपास करून विविध विद्युत उपकरणे जोडलेली आढळली. विविध उपकरणांचा 20 एचपी (14.92​ किलोवॅट) इतका वीजभार ​विद्युतभारित करून वीजचोरी होत होती. या ग्राहकाने अनधिकृतरीत्या 28 हजार 346 युनिट​ वीज वापरून 5 लाख 41 हजार 340​ रुपयांची वीजचोरी केली. वीजचोरीच्या या रकमेसह 3 लाख 50 हजार रुपये तडजोड रक्कम असे एकूण 8 लाख 91 हजार 340​ रुपये रकमेचे बिल भरण्यास वापरकर्ता प्रकाश अशोक जैन याने टाळाटाळ केली. त्यामुळे सहायक अभियंता आगरे यांच्या फिर्यादीवरून आरती दीपक जैन व प्रकाश अशोक जैन या दोघांवर भारतीय विद्युत कायद्याच्या कलम 135 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

 

READ ALSO

स्मार्ट मीटरमध्ये छेडछाड; आणखी ५ ग्राहकांवर गुन्हे

महिलेच्या घरातून लाखो रुपयांचा ऐवज लांबविणारे दोघे चोरटे भावंड गजाआड

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonElectricity theft worth ₹47 lakh in factories; cases registered against three individuals across two incidents.

Related Posts

गुन्हे

स्मार्ट मीटरमध्ये छेडछाड; आणखी ५ ग्राहकांवर गुन्हे

September 1, 2026
गुन्हे

महिलेच्या घरातून लाखो रुपयांचा ऐवज लांबविणारे दोघे चोरटे भावंड गजाआड

September 1, 2026
गुन्हे

तीन लाख रुपये अन् सोन्याच्या अंगठीसाठी विवाहितेचा छळ

September 1, 2026
धरणगाव

अल-फलाह फाउंडेशनतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; शैक्षणिक व करिअर मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना नवी दिशा

September 1, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 01 सप्टेंबर 2026 !

September 1, 2026
गुन्हे

मागील भांडणावरुन दाम्पत्याकडून महिलेवर चाकूने वार

August 31, 2026
Next Post

Today's Horoscope आजचे राशीभविष्य 02 सप्टेंबर 2026 !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

अमित शाहांना श्वसनाचा त्रास ; ‘एम्स’ रुग्णालयात दाखल

September 13, 2020

डॉ. उल्हास पाटील अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची परिसर मुलाखतीत निवड

July 6, 2021

मोठी बातमी : जिल्हा बँकेचे चेअरमन संजय पवार राष्ट्रवादीतून बडतर्फ !

May 17, 2023

पाळधी : महात्मा जोतिबा फुले जयंती निमित्ताने विवाह समारंभात वाटले पाचशे गुलामगिरी पुस्तक

April 11, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group