TheClearNews.Com
Friday, February 6, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

कृषिपंप वीजजोडणी धोरणात शेतक-यांनी सहभागी होण्यासाठी ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांचे लोकप्रतिनिधींना आवाहन

The Clear News Desk by The Clear News Desk
January 21, 2022
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) राज्यातील शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भर पडण्यासाठी राज्य शासनाने “कृषीपंप वीजजोडणी धोरण २०२०” जाहीर केले आहे. या धोरणाचा शेतकऱ्यांना जास्तीत जास्त लाभ घेण्यासाठी प्रयत्न करण्यासंदर्भात राज्याचे ऊर्जामंत्री ना. डॉ. नितिन राऊत यांनी राज्यातील सर्व पालकमंत्री व मंत्री महोदय, खासदार, आमदार तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी, सदस्य व सरपंचांना पत्राव्दारे आवाहन केले आहे.

महाराष्ट्र राज्य कृषी क्षेत्रात एक अग्रेसर राज्य म्हणून गणले जाते. राज्यातील शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भर पडण्यासाठी राज्य शासनाने “कृषीपंप वीजजोडणी धोरण २०२०” जाहीर केले आहे या धोरणांतर्गत कृषिपंप वीज ग्राहकांना तात्काळ वीज कनेक्शन देणे आणि दिवसा वीजपुरवठा करणे नियोजित आहे. या योजनेंतर्गत थकीत बिलावरील संपूर्ण विलंब आकार माफ करुन शेतकऱ्यांच्या वीज बिलात ६६ टक्क्यांपर्यंत वीज बिल माफीची सवलत देण्यात आलेली आहे. या धोरणांतर्गत आज पर्यंत एकूण ३.७५ लक्ष कृषी ग्राहक आणि १३३० गावे, ३० हजारावर रोहित्रे संपूर्ण थकबाकी मुक्त झाले असून त्यांचे वीज बील कोरे झालेले आहे. याशिवाय वीज बील भरणा रकमेतून निर्माण झालेल्या “कृषी आकस्मिक निधी (ACF)” मधून ७७,२९५ नवीन कृषी विद्युत जोडण्या देण्यात आलेल्या आहेत आणि ७१ नवीन उपकेंद्रांना मंजुरी दिली असून १२ उपकेंद्र उभारणीची कामे प्रगती पथावर आहेत.

READ ALSO

ॲड. व्ही.एस.भोलाणे यांची भाजप कायदा आघाडी जिल्हा उपाध्यक्षपदी निवड; धरणगाव वकील संघटनेतर्फे सत्कार

दरेगाव आंबापाड्यात ‘स्मार्ट’ योजनेचा जागर मेळाव्यात दिल्या 60 नवीन वीजजोडण्या

कृषिपंप वीज धोरणांतर्गत कृषिपंप वीज ग्राहकांना तात्काळ वीज कनेक्शन देणे आणि दिवसा वीजपुरवठा करणे नियोजित आहे. या योजनेंतर्गत संपूर्ण विलंब आकार माफ करुन शेतकऱ्यांच्या वीज बिलात ६६ टक्क्यांपर्यंत वीज बिल माफीची सवलत देण्यात आलेली आहे शेतकऱ्यांचे वीज बिल कोरे करण्याचा राज्य शासनाचा मानस आहे. राज्यातील सर्व कृषिपंप ग्राहकांचे वीज बिल कोरे करण्यासाठी प्रत्येक कृषिपंप ग्राहकांने या योजनेत सहभागी होऊन आपले वीज बिल कोरे करण्यासाठी त्यांना प्रोत्साहित व प्रेरित करणे अपेक्षित असून शेतक-यांच्या सोयीसाठी ग्रामपंचायत, विविध सहकारी संस्था, साखर कारखाने यांच्यामार्फत वीजबिल भरण्याचा पर्याय उपलब्ध केलेला आहे. ग्रामपंचायतींना प्रोत्साहित करण्यासाठी ग्राहकांकडील थकबाकीमधून वसूल केलेल्या रकमेवर 30 टक्के पर्यंत मोबदला दिला जाणार आहे. वसूल झालेल्या कृषिपंप वीज बिल निधीपैकी ३३ टक्के रक्कम ग्रामपंचायत स्तरावर व ३३ टक्के रक्कम जिल्हा स्तरावर कृषिपंप ग्राहकांच्या पायाभूत सुविधांकरिता वापरण्यात येणार आहे.

ग्रामपंचायत स्तरावर पायाभूत सुविधेमध्ये नवीन कृषिपंप वीज जोडणी देणे, वितरण रोहित्रांची क्षमतावाढ करणे, नवीन वितरण रोहित्र बसविणे, लघुदाब वाहिनीचे बळकटीकरण करणे, ११/२२ के. व्ही. वाहिन्यांचे बळकटीकरण करणे अशा स्वरुपाची कामे घेण्यात येणार आहेत. कृषिपंपांच्या वसुलीतील 33 टक्के निधी हा त्याच ग्रामपंचायती क्षेत्रात वापरण्यासाठी शासनाने धोरणात्मक निर्णय घेतला असल्याने ग्राहकांचा पैसा त्यांच्या सुविधेसाठी तात्काळ वापरता येईल आणि ग्रामपंचायत स्तरावर सुविधा निर्माण करता येतील अशी तरतूद या योजनेत केलेली आहे.

ग्रामस्थांना कृषिपंप वीजजोडणी धोरणाची जास्तीत जास्त माहिती व्हावी या उद्देशाने येत्या दि.२६ जानेवारी २०२२ रोजीच्या प्रजासत्ताक दिन कार्यक्रमात “कृषीपंप वीजजोडणी धोरण २०२०” चा लाभ घेण्यासाठी कृषिपंप ग्राहकांना प्रवृत्त करुन त्यांचे वीज बिल कोरे करुन आपले गाव थकबाकीमुक्त करावे, अशी विनंती डॉ. राऊत यांनी राज्यातील सर्व लोकप्रतिनिधींना या पत्राच्या माध्यमातून केली आहे.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

ॲड. व्ही.एस.भोलाणे यांची भाजप कायदा आघाडी जिल्हा उपाध्यक्षपदी निवड; धरणगाव वकील संघटनेतर्फे सत्कार

February 5, 2026
जळगाव

दरेगाव आंबापाड्यात ‘स्मार्ट’ योजनेचा जागर मेळाव्यात दिल्या 60 नवीन वीजजोडण्या

February 5, 2026
गुन्हे

फिरण्यासाठी घेवून जात अल्पवयीन मुलीवर अत्याचार

February 5, 2026
जळगाव

स्थायी समिती सभापती, स्वीकृत नगरसेवकांसाठी रस्सीखेच

February 5, 2026
गुन्हे

एमआयडीसी पोलिसांची कारवाई; गोवंश मांस वाहतूक प्रकरणी 70 किलो मुद्देमालासह आरोपी ताब्यात

February 4, 2026
जळगाव

बापरे! खेळण्यातील नोटा देऊन व्यापाऱ्याला 6 लाखात लुटले

February 4, 2026
Next Post

तुला ब्रा घालायला आवडत नाही का? ; मलायका अरोरा झाली ट्रोल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पी.आर.हायस्कूलच्या शिक्षकांनी करुन घेतली कोविड टेस्ट !

November 18, 2020

जळगाव महापालिकेसाठी भाजपचा मोठा शक्तीप्रयोग; वैशाली पाटील भरणार उमेदवारी अर्ज

December 30, 2025

महाविकास आघाडीच्या प्रचारार्थ सायकल दौऱ्यासह चौकसभा

April 20, 2024

‘दिशा’ समितीत 27 विभागांचा घेतला आढावा !

August 3, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group