जळगाव (प्रतिनिधी) ‘वैक्सीन सभी को मिल रही है ! मगर आपको अक्कल नही आई, अशा शब्दांत भारतीय जनता पक्षाचे जळगाव येथील खासदार उन्मेष पाटील यांनी खासदार राहुल गांधी यांच्या टीकेला उत्तर दिलंय.
काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे ट्विटर वरून भारतीय जनता पक्ष व त्यांच्या नेत्यांवर देशातील विविध प्रश्नांवरून हल्ला करीत असतात. त्यांनी देशातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर कोरोना लस उपलब्ध नसल्यामुळे टीका केली आहे. राहुल गांधी यांनी ‘व्हेअर आर वैक्सीन’ या हॅशटॅग’खाली ट्विट करीत म्हटले आहे की, ‘जुलाई आ गया है, वैक्सीन नही आयी!’
खासदार राहुल गांधी यांच्या ट्विट वर भारतीय जनता पक्षाचे जळगाव येथील खासदार उन्मेष पाटील यांनी ट्विट करीत म्हटले आहे की, ‘वैक्सीन सभी को मिल रही है ! मगर आपको अक्कल नही आई.