TheClearNews.Com
Friday, March 13, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगाव महापालिकेच्या पाईपलाईन चोरीत सुनील महाजन यांचे नाव समोर आल्याने खळबळ !

सुनील महाजन हे शिवसेना ठाकरे गटाचे नेते तथा माजी मनपा विरोधी पक्षनेते !

vijay waghmare by vijay waghmare
December 4, 2024
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव प्रतिनिधी – शहराला कधी काळी पाणी पुरवठा करणाऱ्या गिरणा पंपींग प्लांटवरून येणारी जुनी पाईपलाइन जेसीबीद्वारे चारी खोदून चोरी केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी मनपा अभियंता यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तालुका पोलिसात शिवसेना ठाकरे गटाचे नेते तथा महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते सुनील सुपडू महाजन यांच्यासह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून अजून काही मोठे चेहरे अडकण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यामुळे जळगावच्या राजकीय वर्तुळात उडाली प्रचंड खळबळ उडाली आहे.

जळगाव शहर महानगरपालिका पाणी पुरवठा विभाग उपअभियंता योगेश प्रकाश बोरोले यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दि.२ रोजी ते उमाळे येथील फिल्टर प्लॉन्टचे कामकाज पाहण्यासाठी गेलो असता त्यांना कॉण्ट्रक्टर सुमीत सोनवणे यांनी फोन केला. गिरणा पंपींग जवळ आर्यन पार्कच्या समोर असलेली जुनी पाण्याची लोखंडी पाईप लाईन कोणीतरी जेसीबी वाहनाच्या साह्याय्याने चारी खोदुन काढत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे बोरोले यांनी आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळ गाठले.

READ ALSO

जळगावकरांना ६ रुपयात मिळणार १ हजार लिटर पाणी

जुन्या वादातून दारुच्या नशेत असलेल्या टोळक्याकडून प्रौढाला मारहाण

जेसीबीच्या साहाय्याने चोरी करताना पकडले !

सायंकाळी ६.३० वाजेचे सुमारास योगेश बोरोले हे शामकांत भांडारकर (इंजीनिअर), विशाल सुर्वे, दिपक चौधरी यांच्यासह त्याठिकाणी पोहचले. त्यावेळी एक पिवळ्या रंगाचे जेसीबीवरील दोन इसम हे जेसीबीच्या साह्याय्याने जुन्या पाईप लाईन मधील बीडचे पाईप काढताना मिळुन आले. जेसीबी चालक नरेंद्र निवृत्ती पाणगडे, व रवण चव्हाण अशी त्यांची नावे समोर आली.

एकाने काढला पळ, तिघांची सांगितली नावे !

अधिकाऱ्यांनी दोघांना जेसीबीच्या खाली उतरण्यास सांगितले असता रवण चव्हाण हा लक्ष विचलीत करुन तेथून पळून गेला. नरेंद्र पाणगडे याचेकडे चौकशी करीत असताना अक्षय अग्रवाल हा देखील त्या ठिकाणी उपस्थित झाला. नरेंद्र पाणगडे यास सदरची पाईप लाईन कोणी खोदावयास सांगितली? अशी विचारणा केली असता त्याने अक्षय अग्रवाल, भावेश पाटील व अमिन राठोड यांचे सांगण्यावरुन खोदली असुन सदर जेसीबी आणण्याबाबत अक्षय अग्रवाल याने मला सांगितल्याने मी सदर जेसीबी आणुन त्याव्दारे पाईप लाईन खोदुन त्यातुन जुने पाईप काढत असल्याचे सांगितले.

जेसीबी, पाईप जप्त, सहा जणांविरुद्ध गुन्हा !

अधिकाऱ्यांनी अक्षय अग्रवाल याचेकडे चौकशी केली असता त्यानेच सदर जेसीबी वाहन सदर ठिकाणी पाठविल्याचे सांगितले. यावरून महापालिकेचे पाणीपुरवठा विभागाचे उप अभियंता योगेश बोरुडे यांच्या फिर्यादीवरून अक्षय अग्रवाल, नरेंद्र पानगडे, रवण चव्हाण, भावेश पाटील, अमीन राठोड आणि सुनील महाजन या सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुनील महाजन हे जळगाव शहर विधानसभा लढविणाऱ्या ठाकरे गटाच्या उमेदवार तथा माजी महापौर जयश्री महाजन यांचे पती आहेत. गुन्हा दाखल झाल्यानंतर जळगावच्या राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली असून याआधी देखील अशाच प्रकारे पाईप चोरी झाल्याचा एक गुन्हा दाखल आहे. त्यामुळे याप्रकरणाची पाळेमुळे दूरपर्यंत जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

ठेका नसतानाही काढली पाईप लाईन !
दरम्यान, चौकशीत पाईप लाईन काढण्याबाबत कोणताही ठेका दिलेला नसल्याचे देखील चौकशीत समोर आले आहे. सुरूवातीला अक्षय मनोज अग्रवाल भावेश भानुदास पाटील, अमिन सलीम राठोड नरेंद्र निवृत्ती पाणगडे (30, रा.शिरसोली) या चार जणांविरोधात रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर रोहन किशोर चौधरी आणि सुनील सुपडू महाजन यांची नावे वाढवण्यात आली. दरम्यान, सुनील महाजन यांच्याशी संपर्क साधला असता होऊ शकला नाही.

मनपाचे माजी विरोधी पक्षनेते महाजन यांच्या घरी दोन वेळा धडकले पोलिस

या गुन्ह्यात मनपाचे माजी विरोधी पक्षनेते सुनील सुपडू महाजन हे संशयित आरोपी आहेत. शोधासाठी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांचे पथक महाजन यांच्या घरी गेले होते; परंतु ते घरी मिळून आले नाहीत. दुपारी १ वाजता स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बबन आव्हाड, विजयसिंग पाटील, अक्रम शेख, अतुल वंजारी यांचे पथक महाजन यांना अटक करण्यासाठी त्यांच्या घरी गेले होते; परंतु ते आढळले नाही. दुपारी ३ वाजता पुन्हा एकदा पोलिस खासगी वाहनाने त्यांच्या घराकडे गेले होते. तेव्हाही ते त्यांच्या घरी मिळून आले नाही. तर पोलिस अधिकाऱ्यांनी तपास करूनच न्यायालयात सुनील वामन महाजन नावाच्या व्यक्तीची माहिती दिली आहे. त्या नावाशी माझा काहीही संबंध नाही. गैरसमजातून घरी पोलिसांनी विचारणा केल्याचे सुनील महाजन यांचे म्हणणे आहे

जळगाव शहराला पाणीपुरवठा करणारी व सध्या बंद अवस्थेत असलेली इंग्रज कालीन पाईपलाईन चोरून नेण्याचा प्रयत्न केला. साधारण तीन-चार किलोमीटरची पाईप लाईन होती, साधारण तिची किंमत पाच लाखांची होती.

योगेश बोरोले

(उप अभियंता पाणीपुरवठा विभाग, जळगाव महापालिका)

यासंदर्भात पालिकेच्या उपभियंतांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून सहा आरोपीविरुद्ध हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यापैकी पाच आरोपींना अटक करण्यात आली होती. कोर्टात हजर केल्यावर त्यांना जामीन मिळाला आहे. तर एक आरोपी अद्याप फरार असून पोलीस पुढील तपास करीत आहे. साक्षीदारांचा जबाब, तांत्रिक विश्लेषण आणि कॉल रेकॉर्डच्या आधारे आरोपींमध्ये आणखी काही नावे वाढवली आहेत.

संदीप गावित
(उपविभागीय पोलीस अधिकारी, जळगाव)

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

जळगावकरांना ६ रुपयात मिळणार १ हजार लिटर पाणी

March 12, 2026
गुन्हे

जुन्या वादातून दारुच्या नशेत असलेल्या टोळक्याकडून प्रौढाला मारहाण

March 12, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
गुन्हे

मुक्ताईनगर भूसंपादन प्रकरणात एकनाथ खडसे यांच्याविरोधात SIT चौकशीची होणार

March 11, 2026
गुन्हे

तरुणीचा पाठलाग करून प्रेमसंबंध ठेव म्हणत केला विनयभंग

March 11, 2026
गुन्हे

चौघांकडून तरुणाला लोखंडी पाईपने बेदम मारहाण

March 11, 2026
Next Post

Today Horoscope : आजचं राशिभविष्य, ४ डिसेंबर २०२४ !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

राज्यातील काही शहरांमध्ये लॉकडाऊन केले जाऊ शकते, आरोग्यमंत्र्यांची माहिती

March 22, 2021

शाळेतून घरी जाणाऱ्या शिक्षिकेला टिप्परने चिरडले !

October 27, 2023

सासरवाडीहून घरी परतणाऱ्या मनपा कर्मचाऱ्याचा अपघाती मृत्यू !

December 20, 2023

जयंत पाटील-देवेंद्र फडणवीस एकाच गाडीत ! राजकीय चर्चेला उधाण

September 18, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group