अकोला (वृत्तसंस्था) अकोल्यात एका दिव्यांग तरुणाने लहान मुलांना खाऊ आणि चॉकलेटचं आमिष दाखवून त्यांच्यावर अनैसर्गिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अकोल्याच्या कोतवाली पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत २१ वर्षीय दिव्यांग तरुण आकाश बंडू डोंगरे राहतो. आकाशला एक पाय नाहीये. आकाशने आपल्याच परिसरातील १०-१२ वयोगटातील मुलांना चॉकलेट, पतंग आणि मांजाचं आमिष दाखवून अनेकदा त्यांच्यावर अनैसर्गिक कृत्य केलं. पोलिसांनी आरोपी आकाशविरुद्ध पॉस्को आणि संबंधित कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली यानंतर न्यायालयात हजर केले असता आरोपीला तीन फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.