धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील पाळधी येथे शाहिद जवान परिवार सन्मान सोहळा व माजी सैनिक स्नेह संम्मेलन उत्साहात पार पडले. निवृत्त अर्धसैनिक बल (पॅरा मिल्ट्री फोर्स) यांची राष्ट्रीय स्तरावरील असोसिएशनच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्याची संधी आज मिळाली.
जळगाव जिल्ह्यातील शहीद झालेले अर्ध सैनिक दलाचे जवान यांच्या परिवाराचा सन्मान सोहळा व निवृत्त जवान यांच्या विविध समस्या या बाबत चर्चासत्र असे कार्यक्रमाचे स्वरूप होते. Confederation Of Ex-Paramiltri Forces Welfare Association (COPEMFWA)चे राष्ट्रीय अध्यक्ष-व्ही के शर्मा-हिमाचाल (DIG/Rtd)असोसिएशनचे वरीष्ठ पदाधिकारी देवेंद्र बक्षी-(दिल्ली), मनोज तेवतीया-(उत्तर प्रदेश),मोहन राव-(आंध्र प्रदेश), किरण पाल सिंग, एस एस संधू, मनबीर काटोच, दिलीप शार्दुल यांच्यासह विविध जिल्ह्यातील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी शाहिद परिवाराचा सन्मान करण्यात आला.
अर्ध सैनिक बल च्या जवानांना सैनिक बल सारख्या सुविधा नाहीत. शहिद चा दर्जा नाही अशा अनेक समस्या आहेत हे समजले. याबाबत त्यांच्या मागण्यांसाठी योग्य तो लढा उभारू अशी ग्वाही दिली. असोसिएशन ने विशिष्ट कॅप व मोमेंटो देऊन माझाही सन्मान केला. देश भरतल्या निवृत्त जवान यांच्या सोबत चार तास कसे गेले हे समजले नाही.त्यांचा सोबत जेवण सुद्धा घेतले याचा खूप आनंद घेतला.
वर्ग मित्र विजय सपकाळे(निवृत्ती जवान बी एस एफ) असोसिएशन चे जिल्हा अध्यक्ष आहे तर बाळू पाटील उप अध्यक्ष आहेत. निवृत्त जवान रफिक शेख जिल्हा सचिव पदावर कार्यरत आहेत.रत्नाकर चौधरी उप सचिव आहेत. कार्यक्रमात अल फैज पटेल याने उत्तम सूत्र संचालन केले.