ब्रिटन (वृत्तसंस्था) एफटीसीने एकाधिकारशाहीच्या मुद्यावर अमेरिकेत खटला दाखल केल्यानंतर फेसबुकच्या (Facebook Meta) युजर्समध्ये घसरण झाल्याचे समोर आले होते. त्याच्या परिणामी फेसबुकच्या शेअरमध्ये मोठी घसरण झाली होती. त्यानंतर आता ब्रिटनमध्ये फेसबुकला, मेटा कंपनीला १५ कोटी पाउंडचा दंड ठोठावण्यात आला आहे. त्याशिवाय मेटाला आपली एक कंपनीदेखील विकावी लागणार आहे.
मेटा कंपनीने मे २०२० मध्ये ४० कोटी डॉलर खर्च करून अॅनिमेटेड इमेज प्लॅटफॉर्म खरेदी केला होता. मेटाकडून झालेल्या या व्यवहारानंतर कंपनीच्या डिजिटल जाहिरातींवर होणाऱ्या परिणामांबाबत कल्पना दिली नव्हती. या गोष्टीला गंभीरपणे घेत ब्रिटनच्या कॉम्पिटिशन अॅण्ड मार्केट्स ऑथिरिटीने मेटा कंपनीला १५ कोटी पाउंडचा दंड ठोठावला. मेटा कंपनीने गिफी कंपनीचे संचलन करण्यासाठी योग्य ती कार्यवाही केली नसल्याचे सांगितले. प्राधिकरणाने या गिफीची विक्री करण्याचे आदेश दिलेत. तर, मेटाने या निर्णयाबाबत नाराजी व्यक्त केली. निकालावर नाराज असलो तरी आम्ही दंडाची रक्कम भरणार असल्याचे ‘मेटा’ने म्हटले.
दरम्यान, CMAने याआधीदेखील फेसबुकला दंड ठोठावला होता. ऑक्टोबर २०२१ मध्ये फेसबुकला ५.५ कोटी पाउंडचा दंड ठोठावला होता.