फैजपूर, ता. यावल (प्रतिनिधी) सावद्याकडून भुसावळकडे तीन वाहनांमधून अवैधरित्या वानेण्यात येणारा तब्बल ८३ लाखांचा गुटखा फैजपूर पोलिसांनी नाकाबंदी दरम्यान पकडला. ही कारवाई अमोदा गावाजवळ बुधवारी पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास करण्यात आली.
सावद्याकडून भुसावळकडे दोन वाहनांमधून अवैधरित्या गुटख्याची वाहतुक होत असल्याची माहिती फैजपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश वाघ यांना मिळाली. त्यांनी लागलीच पोलीस कर्मचाऱ्यांना आमोदा गावाजवळ नाकाबंदी करण्याच्या सूचना दिल्या. रात्रभर नाकाबंदी सुरु असतांना पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास सावद्याकडून भुसावळकडे जाणारे (एमएच १९, सीवाय ९३६४) (एमएच १९, सीएक्स ०२८२) क्रमांकाचे दोन आयश व (एमएच ९, एफजे ६१७१) क्रमांकाच्या तीन वाहनातून राज्यात प्रतिबंधित असलेल्या गुटख्याची वाहतुक करतांना मिळून आले. पोलिसांनी तिघे वाहन जप्त करीत पोलीस ठाण्यात आले. यावेळी वाहनांची तपासणी केली असता, त्यामध्ये सुमारे ८३ लाखांचा गुटखा व ३४ लाखांचे तीन वाहने असा एकूण १ कोटी १७ लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी केला.
जप्त चौघांविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल याप्रकरणी ज्ञानेश्वर सुखलाल चौधरी (वय ३३, रा. कोडगाव ता. चाळीसगाव), जयेश सुभाष चांदेलकर (वय ३३, रा. रामेश्वर कॉलनी), राकेश अशोक सोनार (वय २९, रा. रामेश्वर कॉलनी) व मंगेश सुनिल पाटील (वय ३१, रा. रामनगर, जळगाव) या चौघांना अटक केली. त्यांच्याविरुद्ध फैजपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यातआला आहे.
या पथकाने केली कारवाई
ही कारवाई फैजपूरच्या सहाय्यक पोलीस अधीक्षक अन्नपुर्णासिंह स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक निलेश वाघ, पोलीस उप निरीक्षक मैनुद्दीन सय्यद, पोलीस उप निरीक्षक मोहन लोखंडे, पोहेकॉ गोकुळ तायडे, पोहेकॉ विकास सोनवणे, पोहेकॉ उमेश चौधरी, सफौ विदास सुरदास आणि शासकीय वाहनावरील चालक सफौ अरुण नमायते यांच्या पथकाने केली.