TheClearNews.Com
Monday, September 7, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जैन हिल्स येथे फाली-१२ वार्षिक अधिवेशन

१ ते ८ जूनदरम्यान १५०० विद्यार्थांकडून कृषी उद्योजकतेचे होईल सादरीकरण; सबोर्नी पोद्दार यांची नवीन सीईओ म्हणून घोषणा

vijay waghmare by vijay waghmare
May 30, 2026
in जळगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव ( प्रतिनिधी ) – ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये आधुनिक शेती, कृषी उद्योजकता आणि नेतृत्व कौशल्य विकसित करणाऱ्या ‘फ्युचर ॲग्रिकल्चर लीडर्स ऑफ इंडिया’ (FALI) या संस्थेच्या १२ व्या वार्षिक अधिवेशनात संस्थेच्या नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) म्हणून सबोर्नी पोद्दार यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे. यंदाचे अधिवेशन तीन टप्प्यात जैन हिल्स येथे १ ते ८ जून २०२६ दरम्यान होणार आहे.

जैन इरिगेशनच्या सहकार्याने आयोजित करण्यात येणाऱ्या या अधिवेशनात सुमारे १,५०० विद्यार्थी, ९० कृषी शिक्षक, १८ माजी विद्यार्थी आणि फालीला पाठबळ देणाऱ्या १० कंपन्यांतील ७० हून अधिक वरिष्ठ अधिकारी सहभागी होणार आहेत. सहभागी विद्यार्थी हे फाली-१२ अंतर्गत २१० शाळांमध्ये आयोजित व्यवसाय मॉडेल व कृषी तंत्रज्ञान नवकल्पना स्पर्धांचे विजेते आहेत.
फाली हा इयत्ता ८ वी आणि ९ वीतील ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी राबविला जाणारा अनोखा कार्यक्रम असून, आधुनिक आणि शाश्वत शेतीसाठी आवश्यक तांत्रिक, व्यावसायिक व नेतृत्व कौशल्ये विकसित करण्यावर त्याचा भर आहे. वर्गातील संवादात्मक सत्रे, आधुनिक कृषी प्रकल्पांना भेटी, उद्योगतज्ज्ञांशी संवाद आणि कृषी व्यवसायाची प्रत्यक्ष ओळख या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले जाते.

READ ALSO

संत कबीरांचा सांगीतिक शोध घेणारा परिवर्तन निर्मित ‘हंस अकेला’ ११ सप्टेंबरला मुंबईत

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 07 सप्टेंबर 2026 !

कृषी उद्योजकतेला चालना देण्यासाठी फालीचा विस्तार..
फाली-१२ उपक्रमाला जैन इरिगेशन, गोदरेज ॲग्रोव्हेट, यूपीएल, आयटीसी, स्टारअ‍ॅग्री, प्रॉम्प्ट डेअरीटेक, एसबीआय फाउंडेशन, टाटा रॅलिस आणि ओम्निवोर या अग्रगण्य कृषी व वित्तीय संस्थांचे सक्रिय सहकार्य लाभले आहे. संस्थेच्या आगामी योजनांमध्ये दरवर्षी २५ टक्के वाढ साधत महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश आणि आणखी तीन राज्यांमध्ये विस्तार करणे, माजी विद्यार्थ्यांसाठी इंटर्नशिप, बीजभांडवल व मार्गदर्शन कार्यक्रम वाढविणे तसेच शहरी युवकांसाठी ‘FALI e+’ उपक्रमाचा विस्तार करून कृषी उद्योजकतेला चालना देणे यांचा समावेश आहे.

फालीच्या सीईओपदी सबोर्नी पोद्दार
संस्थेच्या स्थापनेपासून २०१४ पासून सीईओ पदाची जबाबदारी सांभाळणारे हर्ष नौटियाल १ जूनपासून कृषी उद्योजकतेच्या नव्या संधींचा पाठपुरावा करण्यासाठी पदमुक्त होणार आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली फालीने महाराष्ट्रासह तीन राज्यांमध्ये ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी प्रभावी आणि परिवर्तनकारी उपक्रम उभा केला. तसेच देशातील अग्रगण्य कृषी कंपन्यांशी आर्थिक व तांत्रिक भागीदारी निर्माण करण्यातही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. नवीन सीईओ सबोर्नी पोद्दार यांना कृषी, ग्रामीण विकास आणि सामाजिक क्षेत्रातील दहा वर्षांहून अधिक अनुभव आहे. यापूर्वी त्यांनी भारतातील अग्रगण्य ॲग्रीटेक इम्पॅक्ट फंड ओम्निवोर येथे विपणन व तांत्रिक सेवांचे नेतृत्व केले आहे. तसेच मायक्रोसेव्ह कन्सल्टिंगमध्ये अन्न, शिक्षण, ग्रामीण वित्त आणि विकास क्षेत्रातील विविध प्रकल्पांवर काम केले आहे. त्यांनी इन्स्टिट्यूट ऑफ रुरल मॅनेजमेंट आनंद (IRMA) येथून एमबीए तसेच पत्रकारितेतील पदवी व पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे.

फाली भारतीय शेतीचे भविष्य असल्याचे मान्यवरांचे मत…
फाली असोसिएशनचे अध्यक्ष तथा जैन इरिगेशनचे उपाध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल जैन यांनी फालीच्या यशस्वी वाटचालीबद्दल समाधान व्यक्त करताना सबोर्नी पोद्दार यांच्या नेतृत्वाखाली संस्था आणि माजी विद्यार्थी कार्यक्रम अधिक व्यापक होतील, असा विश्वास व्यक्त केला. हवामान-स्मार्ट शेती, आधुनिक तंत्रज्ञान आणि मूल्यसाखळीची कार्यक्षमता वाढविणे हे भारतीय शेतीचे भविष्य असल्याचे त्यांनी नमूद केले. तर नादिर गोदरेज यांनी फालीच्या माजी विद्यार्थी कार्यक्रमाच्या विस्तारासाठी मोठी संधी असल्याचे सांगितले. राज्जू श्रॉफ यांनी फालीमुळे तरुणांमध्ये तांत्रिक, व्यावसायिक आणि नेतृत्व कौशल्यांचा विकास होत असून ते भारतीय शेतीतील उत्पादकता वाढ व हवामान बदलाच्या आव्हानांना सामोरे जाण्यास सक्षम होतील, असे मत व्यक्त केले. फालीच्या उपाध्यक्षा आणि एनबीए एंटरप्राइज सोल्युशन्स टू पॉव्हर्टीच्या अध्यक्षा नॅन्सी बॅरी यांनी सबोर्नी पोद्दार यांच्या नेतृत्वामुळे फालीची कृषी व कृषी उद्योजकतेची प्रेरणा नव्या पिढीपर्यंत अधिक प्रभावीपणे पोहोचेल, असा विश्वास व्यक्त केला.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonFali-12 Annual Convention at Jain Hills

Related Posts

जळगाव

संत कबीरांचा सांगीतिक शोध घेणारा परिवर्तन निर्मित ‘हंस अकेला’ ११ सप्टेंबरला मुंबईत

September 7, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 07 सप्टेंबर 2026 !

September 7, 2026
जळगाव

उद्योजकांच्या विजेचे प्रश्न तत्परतेने सोडवणार

September 6, 2026
कृषी

महिनाभरापासून पावसाची दडी, सोयाबीन, मक्याला मोठा फटका

September 6, 2026
सामाजिक

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 06 सप्टेंबर ते 12 सप्टेंबर 2026 !

September 6, 2026
गुन्हे

थकबाकीपोटी खंडित वीज परस्पर जोडणाऱ्या 28 जणांवर गुन्हे दाखल

September 5, 2026
Next Post

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य 1 ते 7 जून 2026 !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

BHR Scam : गुन्हा दाखल झाला पुण्यात ; खळबळ उडाली चाळीसगावच्या राजकीय वर्तुळात !

January 17, 2023

राजसाहेब दसऱ्याला तुम्हीच मेळावा घ्या ; मनसे नेते संदीप देशपांडे यांची मागणी !

September 3, 2022

‘शरद पवार जाणता राजा नाहीत, त्यांच्या मुखात राम तर बगलेत सुरी’ : सदाभाऊ खोत

September 29, 2021

हा तर लोकशाहीवर सामूहिक बलात्कार, राहुल गांधींना धक्काबुक्की प्रकरणावरून संजय राऊत संतापले

October 2, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group