अकोला (वृत्तसंस्था) डॉक्टर आणि रुग्णाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना अकोल्यात घडली आहे. एका प्रसिद्ध डॉक्टरनं स्वत:च्या रुग्णासोबत अनैसर्गिक संबंध ठेवल्याची घटना उघडकीस आली आहे. डॉ. अनंत शेवाळे असं डॉक्टरचं नाव असून पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत.
या प्रकरणी एका स्थानिक यूट्युब चॅनलच्या प्रतिनिधीनं तक्रार दाखल केली आहे. काही दिवसांपूर्वी पीडित व्यक्तीच्या मित्रासोबत डॉक्टरनं अनैसर्गिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला. याबद्दलची सत्यता पडताळण्यासाठी तक्रारदार रुग्ण बनून डॉक्टरांकडे गेला. त्यावेळी डॉक्टरांनी त्याचे कपडे उतरवले आणि त्याच्याशी अनैसर्गिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला. रुग्ण बनून गेलेल्या यूट्यूब चॅनलच्या प्रतिनिधीनं या घटनेचं स्टिंग ऑपरेशन केलं. ही घटना ४ ऑक्टोबरला घडली. त्यानंतर व्हिडीओ पुराव्यांच्या आधारे तक्रारदारानं डॉक्टरविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी डॉक्टरविरोधात गुन्हा दाखल केला आहे.