TheClearNews.Com
Tuesday, May 12, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

फडणवीसांच्या ताफ्यासमोरच शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न

The Clear News Desk by The Clear News Desk
June 1, 2021
in जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करत असताना एका शेतकऱ्याने कीटकनाशक औषधी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुक्ताईनगर तालुक्यातील उचंदा येथे मंगळवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला.

योगेश पाटील असे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे. ‘माझ्या शेतातील २० हजार केळीच्या झाडांचे वादळात पूर्ण नुकसान झाले आहे. पण नेतेमंडळी बांधावर येऊन साधी पाहणी करायला तयार नाही’, अशी उद्विग्नता व्यक्त करत त्याने टोकाचे पाऊल उचलले.

READ ALSO

जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेत योगेश धोंगडे चॅम्पियन

इयत्ता १० वी परीक्षेत आदित्य चौधरी यांचे यश

योगेश पाटील हा मुक्ताईनगर तालुक्यातील मेळसांगवे येथील रहिवासी आहे. मेळसांगवे शिवारात त्याची केळीची शेती आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या मान्सूनपूर्व वादळी पावसामुळे त्याच्या शेतातील सुमारे २० हजार केळीच्या झाडांचे नुकसान झाले आहे. दोन दिवसांपूर्वी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी तालुक्यात पाहणी दौरा केला. त्यावेळी प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतातील नुकसानीचे पंचनामे करून आर्थिक मदत केली जाईल, असे आश्वासन पालकमंत्र्यांनी दिले होते. मात्र, त्यानंतरही योगेश पाटील याच्या शेतीचे पंचनामे झाले नाहीत. त्यानंतर आज (मंगळवारी) राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे नुकसानीची पाहणी करण्यासाठी तालुक्याच्या दौर्‍यावर आले आहेत. त्यांनी देखील रस्त्यावरील शेतांची धावती पाहणी करून काढता पाय घेतला. आपल्या शेतात पाहणी केली नाही म्हणून त्याचा संताप अनावर झाला. देवेंद्र फडणवीस यांचा ताफा उचंदा परिसरातून रस्त्यावरून जात होता. तेव्हा योगेश पाटील हा ताफ्यासमोर आडवा झाला. त्याने हातात विषाची बाटली घेतली होती. विष प्राशन करणार तोच, पोलिसांनी धाव घेऊन त्याच्या हातातून विषाची बाटली हिसकावल्याने अनर्थ टळला.

यावेळी योगेश पाटील याने तीव्र संताप व्यक्त केला. देवेंद्र फडणवीस हे फक्त फोटोसेशन करायला या ठिकाणी आलेले आहेत. या दौऱ्यातून शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची मदत मिळणार नाही. राज्यात यापूर्वी भाजपचे सरकार असतानाही केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच आली होती. आता राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार हे तर अतिशय निष्क्रिय आहे. शेतकऱ्याला एक रुपयाची देखील आर्थिक मदत मिळणार नाही, असा संताप त्याने व्यक्त केला.

दरम्यान, त्याआधीही खासदार रक्षाताई खडसे यांच्या घरी जाऊन त्यांनी भेट घेतली. त्यानंतर नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी निघाले असता परिवर्तन चौकात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी फडणवीस यांचा ताफा अडवला.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

क्रीडा

जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेत योगेश धोंगडे चॅम्पियन

May 11, 2026
जळगाव

इयत्ता १० वी परीक्षेत आदित्य चौधरी यांचे यश

May 11, 2026
क्रीडा

बुद्धिबळ निवड चाचणी स्पर्धेत जिल्हातील दहा खेळाडूंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड

May 11, 2026
गुन्हे

सुप्रीम कॉलनीत घराचा कडीकोयंडा कापून चोरट्यांची हातसफाई

May 11, 2026
गुन्हे

टॉवर चौकातील उपाध्ये लॉजमधील कुंटणखाण्यावर छापा

May 11, 2026
जळगाव

बुद्धिबळ निवड चाचणी स्पर्धेत जिल्हातील दहा खेळाडूंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड

May 10, 2026
Next Post

खासदार संजय राऊत यांची महापौर-उपमहापौरांनी घेतली भेट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

दुर्दैवी घटना : राज्यात वीज पडून सहा जण ठार !

April 27, 2023

शाहू महाराज रुग्णालयात महापौरांच्या हस्ते पोलिओ लसीकरणाला सुरुवात !

January 31, 2021

देवगाव-देवळी येथे महात्मा गांधी जयंती निमित्त स्वच्छता पंधरवाडयाचे आयोजन !

October 2, 2022

बेकादेशीर बैलांची वाहतुक करणारे आयशर ट्रक जप्त

March 7, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group