यावल : प्रतिनिधी
तालुकयातील आमोदा येथील शिवारात वीज कोसळून शेतात काम करणारा ६० वर्षीय शेतकरी जागीच ठार झाल्याची धक्कादायक घटना बुधवारी दुपारी घडली.
सविस्तर असे की, येथील ६० वर्षीय शेतकरी ज्ञानदेव धनू चौधरी असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. आपल्या आमोदा शिवारातील शेतात पिकाची मशागत करत होते. यावेळी बुधवारी दुपारी १ वाजेपासून अचानक ढगांचा गडगडाट व पाऊस सुरू झाला. त्यात चौधरी यांच्यावर वीज कोसळून ते जागीच ठार झाले. दुपारी १ ते २ वाजेदरम्यान हा प्रकार झाला. ही घटना निदर्शनास येताच शेतमजुरांनी घटनास्थळी धाव घेतली. फैजपूर पोलिसांना माहिती देण्यात आली. फैजपूरचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सिद्धेश्वर आखेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मकसुद शेख, हवालदार उमेश सानप, गोकुळ तायडे, विकास सोनवणे यांनी पंचनामा केला. अकस्मात मृत्यूची नोंद केली. मृत शेतकऱ्याच्या पश्चात मुलगा, मुलगी, आई-वडील आहे.