TheClearNews.Com
Tuesday, August 18, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

केळी पिकावरील कुकुंबर मोसॅक व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेतकऱ्यांनी घ्यावयाची काळजी

The Clear News Desk by The Clear News Desk
August 25, 2021
in कृषी, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) राज्यात केळी पिकाखालील ७४ हजार ६०० हेक्टर क्षेत्र असून महाराष्ट्रात प्रामुख्याने जळगाव, धुळे, नंदुरबार, हिंगोली, नांदेड, परभणी, सोलापूर, अहमदनगर, सांगली व सातारा जिल्ह्यात केळीची लागवड केली जाते. जळगाव जिल्ह्यात ४५ हजार हेक्टर क्षेत्रावर केळीचे पिक घेतले जाते. हेक्टरी ५०/६० टन एवढे उत्पादन मिळते.

उत्पादनाच्याबाबतीत जळगाव जिल्हा आघाडीवर असला तरी सन २००८ पासून सी.एम.व्ही अर्थात कुकुंबर मोसॅक व्हायरस या रोगाचा प्रसार दरवर्षी वाढत आहे. सन १९४३ मध्ये जळगाव जिल्ह्यातच हा रोग प्रथमच आढळून आला होता. स्थानिक भाषेत या रोगास हरण्या रोग म्हणतात. गेल्या वर्षी या रोगाचा संपूर्ण जळगाव जिल्ह्यात उद्रेक झाला होता. प्रामुख्याने रावेर, यावल, मुक्ताईनगर व चोपडा तालुक्यात हा रोग मोठया प्रमाणात आढळून आला होता.

READ ALSO

हातचलाखीकरुन दागिने लांबवणारा चोरटा गजाआड

आरटीओ एजंटला ६ हजारांची लाच घेतांना रंगेहाथ पकडले

रोगास कारणीभूत घटक

सतत ढगाळ वातावरण असणे, जुन-जुलै महिन्यात वारंवार पडणारा अखंडीत पाऊस, हवेचे कमी तापमान (24 अं.से) वाढलेली आर्द्रता हे घटक रोगास अतिशय पोषक असतात. या रोगाची लक्षणे प्राथमिक अवस्थेत ओळखून त्यावर नियंत्रण करणे अत्यंत महत्वाचे आहे. या रोगाचा प्राथमिक प्रसार रोगट कंदापासून होतो. या रोगाचा दुय्यम प्रसार मावा या किडीमार्फत होतो. या विषाणूंची जवळ जवळ 1 हजार यजमान पिके आहेत. यात प्रामुख्याने काकडी, भोपळा, कारली, दुधीभोपळा, गिलके, चवळी, टोमॅटो, वांगी, मिरची त्याप्रमाणे मोठा केणा, छोटा केणा धोतरा, काहे रिंगणी चिलघोळ, शेंदाड, गाजार गवत यांचा समावेश होतो. तसेच एक पीक घेतल्यानंतर दुसरे पीक त्वरीत घेतले जाते त्यात किमान दोन ते तीन महिन्यांचा विश्रांती कालावधी असावा. तसेच पीक फेरपालट करणे अंत्यत गरजेचे आहे. या गोष्टींचा असलंग केला तरच आपण कुकुंबर मोझॅक विषाणूजन्य रोग नियंत्रणात आणू शकतो.
रोगाची लक्षणे

केळी लागवडीनंतर २/३ महिन्यात या रोगाची लक्षणे दिसू लागतात. सुरुवातीस कोवळया पानांवर हरितद्रव्य विरहित, पिवळसर पट्टे दिसतात. हे पट्टे तुटक तुटक किंवा संपूर्ण पानावर आढळून येतात. एका पानावर ½ पट्टे किंवा पूर्ण पानभर पसरलेले असतात. कालांतराने पानाचा पृष्ठभाग आकसला जातो. त्यांच्या कडा वाकड्या होऊन पानांचा आकार लहान होतो. नविन येणारे पाने आकाराने लहान होतात. पानांच्या शिरा ताठर होऊन संपूर्ण पान कडक होते. पान हाताने दाबल्यास कडकड असा आवाज होतो. पानांच्या शिरांमधील भाग काळपट पडून तेथील ऊती मरतात व पाने फाटतात. नविन येणारे पाने आकाराने लहान होतात. रोगाच्या अतितीव्र अवस्थेत पोंग्याजवळील पान पिवळे पडून पोंगा सडतो. अशी झाडे पक्व अवस्थेपर्यंत टिकाव धरत नाहीत. झाडाची वाढ खुंटते, अशा झाडांची निसवण उशीरा अनियमित होऊन फण्या अत्यंत लहान होतात व फळे विकृत आकाराची होतात. त्यावर पिवळया किंवा काळया रंगाच्या रेषा दिसतात. विक्रीसाठी अशा फळांचा काहीच उपयोग होत नाही. तापमान व पाऊस पाणी यातील बदलामुळे काहीवेळा हि लक्षणे नाहीशी होऊ शकतात.
नियंत्रण

एकदा विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर त्यावरील नियंत्रणासाठी त्यावर कोणताही ठोस उपाय करता येत नाही. तथापि, त्याचा पुढील प्रसार रोखण्यासाठी खालील बाबी लक्षात घ्याव्यात.

शेतातील प्रादुर्भावग्रस्त झाडे मुळासकट उपटून, दूर ठिकाणी जाळून किंवा गाडून टाकावी. दर ४/५ दिवसांनी बागेचे पुन्हा निरीक्षण करुन रोगग्रस्त झाडे आढळल्यास त्यांचीही वरील प्रमाणे विल्हेवाट लावावी. बागेतील तसेच बांधावरील सर्व प्रकारची तणे काढून स्वच्छता ठेवावी. केळीत काकडीवर्गीय तसेच टोमॅटो, मिरची, वांगी, मका या पिकांची लागवड करु नये. बागेभोवती रान कारली, शेंदणी, कटूर्ले, गुळवेल यासारख्या रानटी झाडाचे वेल नष्ट करावेत. मावा या वाहन किडीच्या बंदोबस्तासाठी डायमेथोएट ३० ई.सी २० मिली किंवा थायोमिथोक्झाम 25 डब्लु, जी. 2 ग्रॅम किंव इमिडाक्लोप्रीड १७.८ एस.एल ५ मिली या किटकनाकांची १० ली. पाण्यामध्ये मिसळून बाग पूर्णपणे स्वच्छ करुन फवारणी करावी. गाव पातळीवर एकत्रितरित्या नियंत्रणासाठी स्वतंत्र मोहिम राबविणे अत्यंत आवश्यक आहे. तसेच प्रयोगाअंती असे दिसून आलेले आहे की, फलोनिकामाइड ७ ग्रॅम + १५ लिटर पाणी यांची फवारणी केली तर मावा किडीचे नियंत्रण करु शकतो.

विषाणूजन्य रोगाचे प्रमाण दरवर्षी वाढत असून केळी उत्पादकांमध्ये जागृती निर्माण करणे व केळी पिकावरील विषांणूजन्य रोगांचे नियंत्रण करुन नुकसान टाळणे गरजेचे आहे. असे अखिल भारतीय समन्वित फळ सुधार प्रकल्प, केळी संशोधन केंद्र, जळगाव यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

हातचलाखीकरुन दागिने लांबवणारा चोरटा गजाआड

August 18, 2026
गुन्हे

आरटीओ एजंटला ६ हजारांची लाच घेतांना रंगेहाथ पकडले

August 18, 2026
गुन्हे

अकरा गुन्हे दाखल असलेला तन्या येरवडा कारागृहात स्थानबद्ध

August 17, 2026
गुन्हे

तरुणाला हात-पाय बांधून अमानुष मारहाण; चौघांविरुद्ध गुन्हा

August 17, 2026
जळगाव

महावितरणकडून आता दर महिन्याला ‘ग्राहक समाधान शिबिर’

August 16, 2026
जळगाव

महावितरणच्या जळगाव परिमंडलात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

August 16, 2026
Next Post

बीएचआर घोटाळा : कंडारेच नव्हे तर पतसंस्थेशी निगडीत अनेकांचे हात ओले !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

सुपरस्टार पुनीत राजकुमार यांच्या मृत्यूच्या धक्क्याने ‘इतक्या’ चाहत्यांचा मृत्यू

November 6, 2021

चाळीसगावात खळबळ : भर दुपारी अवघ्या ४५ मिनिटात दोन महिलांनी घरातून लांबवले 7 लाख रुपये !

December 23, 2022

राज्य स्टेनोग्राफर संघटनेच्या जिल्हा अध्यक्षपदी डॉ. सोमनाथ वडनेरे !

October 8, 2022

शोएब शेख आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित

November 18, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group