एरंडोल (प्रतिनिधी) शहरातील कासोदा चौफुलीवर आज रात्री झालेल्या भीषण अपघात धरणगावातील एक जण ठार झाल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, अपघातानंतर संतप्त नागरिकांनी अपघातस्थळी रास्ता रोको केला होता.
या संदर्भात मिळालेली प्राथमिक माहिती अशी की, १२ चाकी ट्रक क्र. (एमएच ४८ एटी ७६८२) वरील चालकाने भरधाव वेगाने चालत असतांना दुचाकी क्र (एमएच १९ बीके ०४४२) जोरदार धडक दिली. या अपघात दुचाकीवरील एक जण जागीच ठार तर अन्य दोघं जखमी झाल्याचे कळते. दरम्यान, मयत धरणगाव येथील रहिवाशी असल्याचेही कळते. अपघाताची माहिती कळताच संतप्त नागरिकांनी घटनास्थळी रस्ता रोको केला.
कासोदा चौफुलीवर नेहमी अपघात होत असतात. त्यामुळे याठिकाणी दुतर्फा गतिरोधक बसविणे गरजेचे आहे. तसेच राष्ट्रीय महामार्ग एरंडोलमध्ये तर तर थेट शहराबाहेर काढणे गरजेचे होते. कासोदा चौफुली परिसर आणि जुने एरंडोल भागातील नागरिकांना नवीन वसाहतीत जातांना कासोदा चौफुलीचाच वापर करावा लागतो. तशात याठिकाणी गतिरोधक नसल्यामुळे नेहमी अपघातात होत राहतात. यामुळेच अपघातानंतर संतप्त नागरिकांनी अपघातस्थळी रास्ता रोको केला होता. दरम्यान, मयताचे नाव अद्याप कळू शकले नाहीय.