पुणे (वृत्तसंस्था) पुणे नाशिक महामार्गावर खरपुडी फाटा इथं भीषण अपघात घडला आहे. पायी रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनाने 17 महिलांना जोरात धडक दिली आहे. या अपघातात ५ महिलांचा मृत्यू झाला आहे. तर १३ महिला जखमी झाल्या आहेत. ( Pune Nashik Accident )
पुण्याच्या बाजूने वेगात आलेल्या अज्ञात (महिंद्रा एक्स यु व्ही ) कारने १७ महिलांच्या ग्रुपला जोरदार धडक दिली. यात चार ते पाच महिला वाहनाच्या धडकेत रस्त्यावर पडून अक्षरशः चिरडल्या. त्यातील दोन जागीच ठार झाल्या. तीन रुग्णालयात उपचार सुरु असताना मयत झाली. या महिला पुणे शहरातून खेड तालुक्यातील शिरोली येथील मंगल कार्यालयात स्वयंपाकासाठी जात होत्या. रात्रीच्या सुमारास या महिला येत होत्या. त्यावेळी पुण्याकडून नाशिककडे जाणाऱ्या लेनवर रात्री 11 वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. कारने या महिलांना रस्ता ओलांडताना जोरदार धडक दिली. या अपघातानंतर वाहन चालकाने रस्ता दुभाजक तोडून वाहनासह तेथून पळ काढला.