धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील वाघळूद येथे ईलेक्ट्रीक शॉटसर्किटमुळे आग लागून ९ बिघा शेतातील ऊस जळून शेतकऱ्याचे तब्बल ७ लाख ४० हजाराचे नुकसान झाले आहे.
या संदर्भात गोकुळ पाटील (वय ४८ रा. वाघळुद बु ता. धरणगाव) यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, त्याच्या भाऊ यांच्या नावे वाघळुद बु// शिवारातील वाघळुद-बोरखेडा शिव रस्त्यालगत शेत गट नं. ६९/३,६९/४,६९/५ मध्ये ९ बिघे शेत आहे. या शेतात ऊस लावलेला होता. २ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास ईलेक्ट्रीक शॉर्ट सर्किट होवुन आगीत ऊस जळून खाक झाला. यात अंदाजे ७ लाख ४० हजाराचे नुकसान झाले. याप्रकरणी अकस्मात आगीची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पो.ना. मोती पवार हे करीत आहेत.