जळगाव (प्रतिनिधी) शहरातील सर्वच भागांतील रस्त्यांवरील खड्डे तत्काळ बुजविण्याचे आदेश महापौर जयश्री सुनिल महाजन यांनी आज शहर अभियंता, प्रकल्प अधिकारी, प्रभाग अधिकार्यांसह बांधकाम विभागाच्या कर्मचार्यांना दिले.
शहरातील मुख्य रस्त्यांसह विविध कॉलन्या तसेच उपनगरांतील रस्त्यांवर ‘अमृत’, भुयारी गटार योजनेसह विविध कामांच्या अनुषंगाने मोठ्या प्रमाणात खड्डे तयार झालेले आहेत. मात्र, ते संबंधितांकडून व्यवस्थितपणे न बुजविले गेल्याने जळगावकरांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. या खड्ड्यांमुळे अपघातही होऊ लागले आहेत. यासंदर्भात वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झालेले वृत्त व नागरिकांच्याही तक्रारी येत होत्या. या अनुषंगाने आज शुक्रवार, दि. २३ जुलै २०२१ रोजी दुपारी महापौर जयश्री सुनिल महाजन यांनी आपल्या अध्यक्षतेखाली व उपमहापौर कुलभूषण पाटील, महापालिका आयुक्त सतीश कुलकर्णी यांच्या उपस्थितीत आपल्या दालनात बांधकाम विभागाची बैठक बोलावली. त्यात बांधकाम अभियंते, प्रभाग समित्यांचे अधिकारी, प्रकल्प अधिकार्यांसह कर्मचार्यांना सदर खड्डे तत्काळ बुजविण्याचे आदेश दिले.
शहर अभियंता अरविंद भोसले, प्रकल्प अधिकारी योगेश बोरोले, प्रभाग अधिकारी संजय पाटील, मनीष अमृतकर, योगेश वाणी, प्रकाश पाटील, मिलिंद जगताप यांच्यासह बांधकाम अभियंते यांच्यासह नगरसेवक नवनाथ दारकुंडे, किशोर बाविस्कर यावेळी उपस्थित होते.
शहरातील मुख्य रस्ते, बाजारपेठांसह विविध कॉलन्या तसेच उपनगरांतील रस्त्यांवर ‘अमृत’, भुयारी गटार योजनेसह विविध कामांच्या अनुषंगाने मोठ्या प्रमाणात खड्डे तयार झालेले आहेत. मात्र, ते संबंधितांकडून व्यवस्थितपणे न बुजविले गेल्याने जळगावकरांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. या खड्ड्यांमुळे अपघातही होऊ लागले आहेत. यासंदर्भात वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झालेले वृत्त व नागरिकांच्याही तक्रारी येत असल्याने आज दुपारी महापौर जयश्री सुनिल महाजन यांनी आपल्या अध्यक्षतेखाली व उपमहापौर कुलभूषण पाटील, महापालिका आयुक्त सतीश कुलकर्णी यांच्या उपस्थितीत आपल्या दालनात बांधकाम विभागाची बैठक बोलावली. या बैठकीत शहरातील सर्वच भागांतील रस्ते, बाजारपेठा, कॉलन्या, उपनगरे तसेच अंतर्गत गल्लीबोळांतील रस्त्यांवर ‘अमृत’च्या, भुयारी गटार योजनेच्या कामांमुळे पडलेले खड्डे पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर तत्काळ बुजविण्यात यावेत व जळगावकरांची यातून सुटका करावी. तसेच अमृतचे नळ कनेक्शनही संबंधितांना त्वरित द्यावेत, असे आदेश दिले.