जळगाव (प्रतिनिधी) जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या २१ जागांसाठी सोमवारी दिनांक ११ ऑक्टोबर पासून नामनिर्देशन अर्ज दाखल करण्याला सुरुवात होणार आहे. या निवडणुकीसाठी २१ नोव्हेंबर रोजी प्रत्यक्ष मतदान होणार आहे.
जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी बँकेतील सभागृहात कार्यालय कार्यान्वित करण्यात आले आहे. वाहने आणि विश्रामगृहदेखील सहकार विभागाकडून अधिग्रहित करण्यात आले आहे. बँकेच्या सभागृहातील कार्यालयात निवडणुकीची प्रक्रिया राबवली जाणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून संतोष बिडवई यांची नियुक्तीही आधीच करण्यात आली आहे. जिल्हा बँकेसाठी सर्वपक्षीय पॅनलची चाचपणी सुरू असून, अद्याप जागा वाटपाचा तिढा सुटलेला नाही.
असा असणार कार्यक्रम
■ ११ ते १८ ऑक्टोबरदरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करता येणार
■ २० ऑक्टोबर रोजी छाननी
■ ११ पासून नामनिर्देशनपत्रे दाखल करण्याला सुरुवात होणार असून १८ पर्यंत अर्ज दाखल करता येणार आहे. २० रोजी छाननी होणार आहे. २१ ऑक्टोबर ते ८ नोव्हेंबरपर्यंत माघार
■ २१ नोव्हेंबर रोजी प्रत्यक्ष मतदान
■ २२ नोव्हेंबर रोजी मतमोजणी