जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव गुलाबराव पाटील यांच्या वाढदिवसाप्रित्यर्थ शिवसेना दोनगाव शाखेकडून पाळधी व पथराड येथील कोविड सेंटरला १८ हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली.
जळगाव ग्रामीणचे विधानसभा क्षेत्रप्रमुख संजय पाटील यांच्या शुभहस्ते सदर रक्कम कोविड सेंटरचे संचालक डॉ. पराग पवार यांच्या कडे सुपुर्द करण्यात आला. याप्रसंगी युवा नेतृत्व पाळधी चांदसर जिल्हा परिषद गटाचे सदस्य प्रतापराव पाटील, उद्योगपती धनराज कासट, दोनगावचे माजी सरपंच सुरेश देवराम पाटील, उपसरपंच भाऊसाहेब सुरेश पंढरीनाथ पवार, विकास सोसायटीचे माजी चेअरमन किशोर राघो पाटील, युवा सैनिक अमोल विजय पाटील, राहुल भगवान पाटील, माजी उपसरपंच जितेंद्र कौतिक पाटील, पथराड चे माजी सरपंच शरद शिंदे, चोरगाव चे सरपंच ज्ञानेश्वर सोनवणे, दोनगाव ग्रामपंचायत सदस्य भावलाल राजाराम पाटील, जयदेव जगन्नाथ पाटील, पाळधीचे माजी सरपंच आणि गुलाबराव पाटील फाउंडेशनचे सचिव अरूण पाटील उपस्थित होते.