जळगाव (प्रतिनिधी) सामाजिक सलोखा फेरी अंतर्गत घर जळालेल्या महिलेस जळगाव जिल्हा मणियार तर्फे पाच हजार रुपयांची आर्थिक मदत केली. तसेच पुढे सुद्धा आपणास सहकार्य करण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले.
तांबापुर येथे कायमस्वरूपी सामाजिक सलोखा निर्माण व्हावा, यासाठी एमआयडीसी पोलीस स्टेशन मध्ये झालेल्या शांतता समितीच्या बैठकीत ठरल्याप्रमाणे शुक्रवार रोजी तांबापुरा परिसरात मनियार बिरादरीचे अध्यक्ष फारुक शेख, महानगर अध्यक्ष सय्यद चाँद, शहा बिरादरीचे आसिफ शाह बापू, शिकलगार बिरादरीचे मुजाहिद खान, काकर बिरादरीचे रियाज काकर, बागवान बिरादरीचे मेहमूद बागवान आदींनी तांबापुर परिसरात फेरफटका मारून माहिती जाणून घेतली.
अजमेरी गल्लीतील नसरीन बी शकील यांच्या घराला आग लागून तिचे घरातील वस्तू, सामान, कपडे व बेड सर्व जळून खाक झालेले होते. सदर बाब मनियार बिरादारीचे अध्यक्ष फारूक शेख यांच्या निदर्शनास आणून देताच त्यांनी या महिलेस जळगाव जिल्हा मणियार तर्फे पाच हजार रुपयांची आर्थिक मदत केली व पुढे सुद्धा आपणास सहकार्य करण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले. यावेळी तांबापुर परिसरातील अफजलखान, अक्रम शेख, अफसर शेख ,अक्रम खान बादशहा ,इमरान टेलर आदींची उपस्थिती होती. लवकरच तांबापुर परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी सामाजिक सलोखा अंतर्गत तेथील सर्व धर्मीय राजकीय व सामाजिक नेत्यांसोबत बैठका घेण्यात येईल असे फारुक शेख यांनी कळविले आहे.