बोदवड (प्रतिनिधी) येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात असलेल्या रुपम प्रोव्हिजन या यांचे गोदामास आज संध्याकाळी आग लागून लाखोंचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात असलेल्या रुपम प्रोव्हिजन नावाचे गोदाम आहे. आज संध्याकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास अचानक आग लागून लाखोंचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. गावातील खाजगी तसेच जिनिंग प्रेसिंगचे पाण्याचे टँकर साहाय्याने नागरिकांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. नंतर साडेसातच्या सुमारास जामनेर नगरपरिषदेच्या अग्निशमन वाहनाने येऊन आग विझवली. दरम्यान, आग कशामुळे लागली, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाहीय.
















