जळगाव (प्रतिनिधी) शिवसेनेची मुलूख मैदानी तोफ म्हणून परिचीत असलेले महाविकास आघाडीचे मंत्री गुलाबराव पाटील फुटल्याची चर्चा असून ते गुहाटीला रवाना झाल्याचे वृत्त काही न्यूज चॅनेलने दिले आहे. विशेष म्हणजे ना. पाटील यांनी आधी समर्थकांना जय महाराष्ट्र पाठवलं आणि त्यानंतर ते नॉटरिचेबल झालेत.
एकनाथ शिंदे समर्थक मोठ्या संख्येनं आमदार घेऊन गुवाहाटीमध्ये गेले आहेत. आता गुलाबराव पाटील नॅटरिचेबल असल्यानं हे शिंदेंच्या गटात तर गेले नाहीत ना, असाही प्रश्न सध्या चर्चेत आहे. अनेक जणांनी मानधरणी करण्याचा प्रयत्न शिवसेनेकडून अयशस्वी ठरला. एकनाथ शिंदे हे आपल्या निर्णयावर ठाम असून आता सुरत येथून एकनाथ शिंदे यांचा गुवाहटीतील रॅडिसन हॉटेल पोहचले आहे. दरम्यान, आपल्या सोबत ४० आमदार असल्याचा दावा एकनाथ शिंदे यांनी केला आहे. दरम्यान, राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील हे देखील नॉट रिचेबल असून ते देखील गुवाहटीकडे रवाना झाल्याची माहिती एका वृत्तवाहिनीने प्रसिध्द केले आहे.