TheClearNews.Com
Saturday, March 28, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

तरुणाच्या खून प्रकरणी एकाच परिवारातील पाच जणांना जन्मठेप !

The Clear News Desk by The Clear News Desk
November 7, 2020
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) दारू पिण्यासाठी पैसे दिले नाही म्हणून शहरातील राजीव नगर परिसरात जुलै २०१७ मध्ये एका तरुणाचा चाकूने भोसकून खून करण्यात आला होता. याप्रकरणी न्यायालयाने आज एकाच परिवारातील पाच जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. दरम्यान, आरोपींमध्ये दोन महिलांचा समावेश आहे.

 

READ ALSO

जळगाव क्रिकेट लीग’ संघ मालक व आयकॉन खेळाडू जाहीर

निवडणूक आयोगाची ‘SIR’ मॅपिंग प्रक्रिया तातडीने पूर्ण करा; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे आवाहन

या संदर्भात अधिक असे की, यासंदर्भात अधिक असे की, अजय प्रल्हाद सकट (वय २२, रा. राजीव गांधी नगर) याने दिलेल्या फिर्यादीत म्हटले होते की, दि. १२ जुलै २०१७ रोजी त्याचा भाऊ राहुल सकट याचा पगार झालेला होता. त्यामुळे घरासमोर असलेल्या टेकडीजवळील पटांगणात जेवणासाठी गेलेला होता. त्यावेळी सत्यासिंग मायासिंग बावरी याने राहुलकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले. परंतु राहुलने पैसे दिले नाहीत, म्हणून दोघांमध्ये शिवीगाळ झाली. त्यानंतर रात्री १० वाजेच्या सुमारास सत्यासिंग बावरी व त्याचे भाऊ रवीसिंग बावरी, मलिंगसिंग बावरी, आई मालाबाई बावरी, पत्नी कालीबाई बावरी असे घरासमोर आले व त्यांनी शिवीगाळ करून राहुलला लाता-बुक्क्यांनी मारहाण करायला सुरुवात केली. यावेळी माझी आई माळसाबाईने विरोध केला असता सत्यासिंग व रवीसिंगने तिला भिंतीवर ढकलून दिले. त्यामुळे आईंच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. यानंतर सत्यासिंगने धारदार शस्त्राने राहुलच्या पोटाच्या डाव्या बाजूला चाकू खुपसून गंभीर दुखापत केली. त्यानंतर याप्रकरणी रामानंदनगर पोलीस स्थानकात भादवि कलम १४३,१४७,१४८,१४९,३२३,३०७,५०४ मुंबई पोलीस ऍक्ट ३७ (१) (३) चे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दरम्यान दुसरीकडे राहुल सकट यांची प्रकृती खालावल्यामुळे त्याला पुढील उपचारासाठी मुंबई येथे रवाना करण्यात आले होते. परंतु नाशिक जवळच त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर नाशिक येथेच त्याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. यानंतर आरोपींवर ३०२ हे अतिरिक्त कलम वाढविण्यात आले होते. याप्रकरणी ऑक्टोबर २०१७ मध्ये पहिले चार्जशिट दाखल करण्यात आले होते. तर २६ नोव्हेंबर २०१७ पासून या खुनाच्या खटल्याला सुरुवात झाली.

एकूण १४ साक्षीदार तपासण्यात आले होते. त्यात मनोज नाणे, अरविंद पाटील, अजय सकट, योगेश जाधव, प्रत्यक्षदर्शी रमेश झेंडे, प्रवीण सोनवणे, म्हाळसाबाई सकट, चंद्रकांत हतांगडे, डॉ. जितेंद्र विसपुते, डॉ. प्रविण पाटील, पोलीस कॉन्स्टेबल सुरेश मेढे, पीएसआय राजेश घोळवे, पोलीस निरीक्षक रोहिदास ठोंबरे, डॉ.निखिल सैंदाणे यांचा समावेश होता.

या प्रकरणी अंतिम सुनवाई नंतर आज अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर.जे. कट्यारे यांनी या खटल्यात पाचही आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. आरोपींना जन्मठेपेसह एक हजार रुपयाचा दंड तसेच दंड न भरल्यास तीन महिन्यांची साधी कैद अतिरिक्त भोगावी लागणार आहे. विशेष म्हणजे पाचही आरोपी लावलेल्या प्रत्येक कलमात दोषी आढळलेले आहे. या प्रकरणी सरकार पक्षाकडून अॅड.केतन ढाके तर आरोपी पक्षाकडून अॅड.हेमंत सूर्यवंशी,अॅड.केदार भुसारी,अॅड. प्रवीण पांडे यांनी कामकाज बघितले.

 

सुरत येथून येताना रेल्वेस्थानकातून पकडले

राहुल सकटचा खून झाल्यानंतर मुख्य संशयित सत्यासिंग फरार झाला होता. मारेकऱ्यांच्या अटकेसाठी पोलिसांवर प्रचंड दबाव होता. याचवेळी पोलीस हेडकॉन्स्टेबल प्रदीप चौधरी यांना सत्यासिंग हा जळगाव रेल्वे स्थानकावर येत असल्याची गुप्त माहिती मिळाली. त्यानुसारप्रदीप चौधरी व पीएसआय राजेश घोळवे, आणि पो.का.शरद पाटील यांनी तात्काळ सापळा रचून सत्यांसिंगला अटक केली.दरम्यान, सत्यासिंग बावरी हा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा असून त्याच्यावर रामानंद नगर जिल्हापेठ व पारोळा पोलिसात दरोड्याचे ३ गुन्हे,पोलिसांवर हल्ला १, चोरी,घरफोडी ४, दंगल २ व खून १ असे एकूण १३ गुन्हे दाखल आहेत. तसेच सत्यासिंग बावरी हा तडीपार देखील होता.बावरी परिवारावर एकूण ४८ गुन्हे दाखल आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

क्रीडा

जळगाव क्रिकेट लीग’ संघ मालक व आयकॉन खेळाडू जाहीर

March 28, 2026
जळगाव

निवडणूक आयोगाची ‘SIR’ मॅपिंग प्रक्रिया तातडीने पूर्ण करा; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे आवाहन

March 28, 2026
जळगाव

भाजप-शिवसेनेचे ५ स्वीकृत नगरसेवकांचे अर्ज ठरले

March 28, 2026
गुन्हे

जीएसटी भरलाच नाही! बनावट ऑडिट रिपोर्ट बनवून सीए पिता-पुत्राने लाटले ५ लाख ६५ हजार

March 27, 2026
गुन्हे

खरेदी खताच्या नोंदीसाठी लाचेची मागणी; तलाठी ACB च्या जाळ्यात!

March 27, 2026
भुसावळ

उसने पैशांच्या वादातून हाणामारी; तिघे गंभीर

March 26, 2026
Next Post

प्रेयसीसाठी गर्भवती पत्नीचा खून ; पतीला जन्मठेपेची शिक्षा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

‘बीएचआर’ घोटाळा : पारस ललवाणी यांच्या अटकेची अफवा !

December 1, 2020

स्टिंग ऑपरेशनमुळं प्रसिध्द डॉक्टरचा ‘पर्दाफाश’ ; पुरुष रुग्णासोबत केला अनैसर्गिक संभोग

October 15, 2021

आम्ही कायम सोबत राहू’ हा ग्रामस्थांची दिलेला विश्वास माझा उत्साह व आत्मविश्वास वाढविणारा : धनंजय चौधरी !

November 6, 2024

तुझ्या मुलाने आमची मुलगी पळवली म्हणत वृद्धाला मारहाण !

April 11, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group