नंदुरबार (वृत्तसंस्था) वाकाचार रस्ता ते नंदुरबारदरम्यान रस्त्यालगत देहविक्रीचा व्यवसाय चालविणाऱ्या हॉटेलवर नंदुरबार उपनगर पोलिसांनी धाड टाकत चार संशयितांना ताब्यात घेतले आहे.
उपनगर पोलीस ठाणे हद्दीतील नंदुरबार ते वाकाचार रस्त्यादरम्यान असलेल्या हॉटेल हायवे येथे दोन ते तीन इसम काही महिलांसोबत संशयितरित्या सोबत असल्याची गुप्त माहिती मिळाल्याने पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस यांच्या मार्गदर्शनाखाली उपनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमितकुमार मनेळ यांच्या पथकाने नंदुरबार ते वाकाचार रस्त्यादरम्यान असलेल्या हॉटेल हायवे येथे छापा टाकला. यावेळी त्यांना तेथे वैश्याव्यवसाय चालविणारे हॉटेल मालक चालक संजय ब्रिजलाल चौधरी (वय ४५, रा. यमुना पार्क), ग्राहक योगेश कैलास अभाडे (वय ४०, रा. पठारे ता. सिन्नर, जि. नाशिक), मंगेश अशोकराव शेजूळ (वय-३४, रा.गोपाळ नगर, पंचवटी, नाशिक) व महेश पांडुरंग काळवांडे (वय ३७, रा. नाशिक) तसेच ३ पिडीत महिला मिळून आल्यात.
हॉटेल हायवेचा मालक चालक संजय ब्रिजलाल चौधरी हा त्याच्या मालकीच्या हॉटेलमध्ये इसमांकडून पैसे स्विकारुन पिडीत महीलांसोबत शारिरीक संबंध करायला लावून स्वतःच्या हॉटेलचा जागेचा वापर करीत होता. याबाबत उपनगर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस, अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन यांचे मार्गदर्शनाखाली उपनगर पोलीस निरीक्षक अमितकुमार मनेळ, सहायक पोलीस निरीक्षक संजोग बच्छाव, सहायक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र दाभाडे, पोशि. विपूल पाटील, कमलाकर चौरे, मपोशि. गणेश गावित अशांनी केली आहे.