TheClearNews.Com
Friday, June 19, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

महसूल पथकाद्वारे ठेवण्यात येणार वाळू ठेक्यांवर लक्ष : विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे

विभागीय आयुक्त कार्यालयात महसूल आढावा बैठक संपन्न

The Clear News Desk by The Clear News Desk
January 13, 2021
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

नाशिक (प्रतिनिधी) अनाधिकृत वाळू चोरी रोखण्यासाठी नाशिक विभागातील नाशिक, अहमदनगर, धुळे, जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यातील टोल नाक्यांवर २४ तास महसूल पथकाची नेमणूक करण्यात यावी. जेणेकरुन या पथकाद्वारे वाळू ठेक्यांवर लक्ष ठेवून वाळू चोरी रोखत येईल, असे विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी महसूल आढावा बैठकीत सांगितले.

विभागीय आयुक्त कार्यालयाच्या समिती कक्षात पाचही जिल्ह्यांचा आढावा विभागीय आढावा व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेण्यात आला. त्यावेळी विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे बोलत होते. यावेळी अपर आयुक्त भानूदास पालवे, उपायुक्त (महसूल) गोरक्ष गाडिलकर, उपायुक्त (पुर्नवसन) दत्तात्रय बोरुडे, उपायुक्त(रोहयो) अर्जुन चिखले, उपायुक्त (सा.प्र) प्रविण देवरे, उपायुक्त (पुरवठा) स्वाती देशमुख, उपायुक्त(विकास) अरविंद मोरे, सहआयुक्त कुंदन सोनवणे उपस्थित होते. तसेच व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे नाशिक येथून जिल्हाधिकारी सूरज मांढरे, मालेगावचे अपर जिल्हाधिकारी धनंजय निकम, अहमदनगर जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, धुळे जिल्हाधिकारी संजय यादव, जळगाव जिल्हाधिकारी अभिजित राऊत, नंदुरबार जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड उपस्थित होते. विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे म्हणाले, विभागातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी पाण्याखाली असलेल्या वाळू घाटांचा शोध घेवून पारंपारिक पध्दतीने त्या खाली असलेल्या वाळूचा अंदाज काढून वाळू लिलावाची कार्यवाही पूर्ण करावी. तसेच बेकायदेशीर मार्गाने होणारी वाळू चोरी रोखण्यासाठी टोल नाक्यावर २४ तास महसूल पथके नेमणूक करुन वाळू चोरी करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची सूचनाही विभागीय आयुक्त गमे यांनी विभागातील जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या.

READ ALSO

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

नाशिक विभागातील सर्व दगडखाणींची ईटीएस मशिनद्वारे मोजणी करुन परवानगी पेक्षा जास्त गौण खनिजाचे उत्खनन झाल्याचे आढळ्यास तात्काळ संबंधितांवर कारवाई करुन वसूली करण्यात यावी. जमीन महसूल वसुली शंभर टक्के होण्यासाठी विभागातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या स्तरावर प्रत्येक आठवड्याला जिल्ह्याचा आढावा घेण्याची सूचनाही यावेळी विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी केली. नाशिक विभागात सनद वाटपाचे काम समाधानकारक असून सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी उर्वरीत सदन वाटपाची कार्यवाही मोहिम स्तरावर करावी. बांधकाम परवानगीचे प्रंलबित प्रकरणे, वनहक्क अधिनियम २००५ अंतर्गत प्रलंबित प्रकरणे लवकरात लवकर निकाली काढावीत. तसेच ज्या ज्या जिल्ह्यांमध्ये तलाठी कार्यालय प्रस्तावित केले आहे, अशा ठिकाणी लवकरात लवकर तलाठी कार्यालयासाठी जागा उपलब्ध करुन देण्यात याव्यात, असेही विभागीय आयुक्त गमे यांनी सांगितले.

कलम १५५मधील ७/१२ मधील दुरस्त्यांची कामे पूर्ण करण्यात यावी. ई-फेरफार आज्ञावलीची शंभर टक्के अमंलबजावणीची करण्यात यावी. अनाधिकृत अकृषिक वापराच्या नोंदी घेऊन कार्यवाही करणे. तसेच इनाम व वतन जमीन शर्तभंग तपासणी व कार्यवाही करण्यात यावी. जिल्हाधिकाऱ्यांनी प्रलंबित उपयोगिता प्रमाणपत्रांचा निपटारा करण्याबाबतची सूचना, श्री गमे यांनी विभागातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या.

महामार्ग भूसंपादन प्रक्रिया चालू असलेल्या प्रकरणामध्ये ताबा देणेवर शिल्लक असलेल्या क्षेत्राबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी आढावा घ्यावा. तसेच ३१ जानेवारी २०२१ पर्यंत शिधापत्रिकांचे आधार सीडिंगचे काम पूर्ण करावे. प्रत्येक जिल्ह्यात घरकुल योजनेचे काम वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना विभागीय आयुकत श्री.गमे यांनी बैठकित दिल्या आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राज्य

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

June 13, 2026
जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
जळगाव

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

February 19, 2026
Next Post

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार नियमावलीत सुधारणांसाठी सुचना पाठविण्याचे आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

७वी अप्पासाहेब म्हसावदकर स्मृती जळगाव जिल्हा मानांकन व निवड कॅरम स्पर्धा

April 29, 2025

महाराष्ट्रदिनी मोफत लसीचं गिफ्ट मिळण्याचे संकेत, राज्य सरकार ग्लोबल टेंडर काढणार : अजित पवार

April 24, 2021

मसाज सेंटरच्या नावाखाली देहविक्री ; पोलिसांनी कुंटणखाना केला उद्ध्वस्त !

September 6, 2024

बीएचआरचे चार बँक खाते सील ; पीएफ आयुक्तांचे जप्तीचे आदेश !

March 17, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group