चाळीसगाव (प्रतिनिधी) शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि शेतीच्या विकासासाठी सातत्याने कार्यरत असलेल्या भाजपा – महायुती सरकारने पुन्हा एकदा संवेदनशीलतेचे दर्शन घडवले आहे. अतिवृष्टीग्रस्त आणि नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने विशेष अतिवृष्टी पॅकेजची घोषणा केली होती त्यात चाळीसगाव तालुक्याचा व जळगाव जिल्ह्यातील इतर तालुक्यांचा समावेश नसल्याचा अपप्रचार काही लोकांनी सुरु केला होता. मात्र चाळीसगाव मतदारसंघाचे शेतकरीपुत्र आमदार मंगेश चव्हाण यांनी आश्वासन दिल्याप्रमाणे शासनाच्या सर्व सवलती चाळीसगावसह जळगाव जिल्ह्याला लागू झाल्या आहेत. त्याचाच भाग म्हणून रब्बी हंगामासाठी बियाणे व इतर अनुषंगिक बाबींकरिता प्रति हेक्टरी ₹१०,००० रुपये (३ हेक्टरच्या मर्यादेत) या दराने ७६.२५ कोटी इतके आर्थिक सहाय्य चाळीसगाव तालुक्यातील ८१ हजार शेतकऱ्यांना देण्यास सुरुवात झाली आहे. तसेच यापूर्वीच २ हेक्टरच्या मर्यादेत १०१ कोटी इतके अनुदान वितरण सुरु झाले असून ३ हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्र असणाऱ्या ३९१३ शेतकऱ्यांना ८ कोटी ४० लाख इतका निधी प्राप्त झाला आहे. यामुळे शासन निर्णयावरून शेतकऱ्यांची दिशाभूल करणाऱ्या बोलबच्चन फेक शेतकरी पुत्रांची मात्र बोलती बंद झाली असून खोट बोलून राजकारणासाठी शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळणाऱ्यांचा चेहरा उघडा पडला आहे.
शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे, भाजपा महायुती सरकार…
चाळीसगाव मतदारसंघातील शेतकऱ्यांसाठी अतिवृष्टी पॅकेजच्या मार्फत मंजूर एकूण अनुदान :
राज्य आपत्ती प्रतिसाद निधी दराप्रमाणे (२ हेक्टर पर्यंत) : ₹१०१ कोटी
अतिवृष्टी पॅकेज अंतर्गत रब्बी हंगामासाठी बियाणे व इतर अनुषंगिक बाबींकरिता प्रति हेक्टरी ₹१०,००० रुपये (३ हेक्टरच्या मर्यादेत) : ₹७६.२५ कोटी
अतिवृष्टी पॅकेज अंतर्गत वाढीव १ हेक्टर पर्यंत अनुदान – ₹८.४० कोटी
अशाप्रकारे यापूर्वीच मंजूर झालेल्या यापूर्ती मदतीसह, चाळीसगाव मतदारसंघासाठी मिळालेलं एकूण सहाय्य आता तब्बल ₹१८५.६५ कोटी रुपयांपर्यंत पोहोचले आहे.
जिल्ह्याला मिळालेल्या ५६२ कोटींपैकी १८५ कोटी निधी म्हणजे ३३ टक्के निधी हा एकट्या चाळीसगाव तालुक्याला – आमदार मंगेश चव्हाण यांची माहिती
शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शासनाने जे दि.९ व १० ऑक्टोबर अतिवृष्टीग्रस्त तालुक्यांचे दोन शासन घेतले होते त्याचा संदर्भ घेऊन काही मंडळींनी शेतकऱ्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला होता. मी तेव्हा शब्द दिला होता की शासनाच्या सर्व सवलती व निधी तालुक्यातील प्रत्येक शेतकऱ्याला मिळेल. आणि जिल्ह्याला मिळालेल्या ५६२ कोटींपैकी १८५ कोटी निधी म्हणजे ३३ टक्के निधी हा एकट्या चाळीसगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळाला आहे. काही बँक ह्या शेतकऱ्यांना मिळालेल्या अनुदानाची रक्कम कर्जखात्यात जमा करत असल्याच्या तक्रारी मला प्राप्त झाल्या होत्या. मी तात्काळ तालुक्याचे तहसीलदार व जिल्हा लीड बँकेचे व्यवस्थापक यांना लेखी सूचना देऊन शेतकऱ्यांचे अनुदानाचा १ रुपया देखील कर्जखात्यात जमा न करण्याचे सांगितले आहे. शेतकऱ्यांना अडचणीच्या काळात मिळालेली ही मदत केवळ आकड्यांपुरती मर्यादित नसून, ती माझी व सरकारची शेतकऱ्यांप्रती असलेली जबाबदारी, संवेदनशीलता आणि बांधिलकी आहे. शेतकरी हा आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. त्याचा सन्मान आणि स्थैर्य हीच खरी विकासाची पायाभरणी आहे. या संवेदनशील निर्णयासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यासह संपूर्ण महायुती सरकारचे आमदार मंगेश चव्हाण यांनी आभार मानले आहेत.
















