TheClearNews.Com
Thursday, October 1, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

कोळी जमातीसाठी अन्नत्याग सत्याग्रह राजकीय ‘स्टंट’ नसून सामाजिक ‘इव्हेंट’ होता : जगन्नाथ बाविस्कर !

अन्नत्याग सत्याग्रहाचे 'ते' सव्वीस दिवस जीवन मरणाचे !

The Clear News Desk by The Clear News Desk
November 17, 2023
in चोपडा, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

चोपडा (प्रतिनिधी) जळगाव जिल्ह्यासह महाराष्ट्रातील आदिवासी कोळी जमातीला कोळी नोंद सामाजिक दर्जानुसार सुलभपणे जात व वैधता प्रमाणपत्र मिळावीत, यासाठी जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आदिवासी कोळी समाजाचे नेते जगन्नाथ बाविस्कर (चोपडा) यांच्यासह संजय कांडेलकर, नितीन कांडेलकर (मुक्ताईनगर), पुंडलीक सोनवणे (भोकर), नितीन सपकाळे (अंजाळे), पद्माकर कोळी (डोंगरकठोरा), सुनिता कोळी (गाते-रावेर), पुष्पा कोळी (बुलढाणा) यांनी दि. १० ऑक्टोबर ते ४ नोव्हेंबर दरम्यान एकूण २६ दिवसांचा तीव्र अन्नत्याग सत्याग्रह केला. कोळी समाजाच्या न्याय व हक्कांसाठी केलेला अन्नत्याग सत्याग्रह हा काहिंना राजकीय स्टंट वाटला परंतु तो आमचा सामाजिक इव्हेंट होता. ‘ते’ २६ दिवस आमच्यासाठी पारिवारीक, शारिरीक, मानसिक, सामाजिक जीवनमरणाचे होते, अशी स्पष्टोक्ती महर्षी वाल्मिकी समाज मंडळाचे तालुका संपर्कप्रमुख जगन्नाथ बाविस्कर (चोपडा) यांनी ह्या पत्रकांन्वये केली आहे.

याआधीही सामा.कार्यकर्ते जगन्नाथ बाविस्कर यांनी अमळनेर व चोपडा प्रांत कार्यालयासमोर अनुक्रमे ५ व ६ दिवसांचा तीव्र अन्नत्याग सत्याग्रह करून शेकडों टोकरेकोळीचे दाखले मिळवुन दिलेले होते.परंतु इतर प्रांतांकडून अडवणुक होत असल्याने आदिवासी कोळी समाज समन्वय समितीने जळगाव येथे कोळी समाजाचा एल्गार पुकारून तीव्र उपोषणाचे हत्यार उपसले होते. याठिकाणी महाराष्ट्रातील हज्जारों समाजबांधवांनी प्रत्यक्ष येऊन पाठिंबा दर्शविला. जिल्ह्यातील सर्वच आजी-माजी आमदार खासदार मंत्री व सर्वपक्षीय / सामा. संस्था संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदविला. राज्यस्तरावरील मागण्यांसाठी खुद्द मुख्यमंत्री यांचेशी समन्वय समितीची दोन वेळेस बैठक होऊन हा प्रश्न सोडविण्यासाठी दोन महिन्यांचा अल्टिमेट सांगीतलेला आहे. तत्पूर्वी प्रत्येक प्रांतांकडे प्रलंबित असलेली प्रकरणे तपासून लाभार्थ्यांना दाखले द्यावेत अशाही सुचना आहेत. जिल्ह्यातील राजकिय, पक्षीय व सामाजिक श्रेयवादामुळे २६ दिवस अन्नत्याग सत्याग्रह सुरू होता. मध्यंतरीच्या काळात सर्वच नेत्यांनी याकडे पाठ फिरवल्यामुळे कोळी समाजाने उग्ररूप धारण केले होते. यामुळे प्रशासनाची तारांबळ उडत होती.परंतु याप्रसंगी कोणतेच गालबोट न लागता कायदा, शांतता व सुव्यवस्था राखून हे आंदोलन यशस्वी झाल्याने कोळी समाजाबद्दल सर्वस्तरातुन गौरवोद्गार काढले जात आहेत. यासाठी समन्वय समितीसह पोलीस, आरोग्य, महसुल विभागाचे विशेष सहकार्य लाभले.

READ ALSO

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 01 ऑक्टोबर 2026 !

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 30 सप्टेंबर 2026 !

महाराष्ट्रातील कोळी समाजाचा बालेकिल्ला !

जळगाव जिल्हा हा महाराष्ट्रातील अखिल कोळी समाजाचा बालेकिल्ला समजला जातो.येथील उपोषणास प्रत्येक जिल्ह्यातील कोळी समाजबांधवांनी हजेरी लावून त्या त्या ठिकाणी आंदोलने उभारली आहेत. जर शासन प्रशासनाने दोन महिन्यात आमचा प्रश्न मार्गी लावला नाही, तर प्रत्येक जिल्ह्यात एकाच दिवशी बेमुदत तीव्र उपोषण आंदोलने छेडण्यात येतील. यासाठी प्रत्येक जिल्ह्यातील समाज संघटनांनी सज्ज राहावे.
-जगन्नाथ बाविस्कर (उपोषणकर्ते), संपर्कप्रमुख- म.वाल्मिकी समाज मंडळ,चोपडा 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 01 ऑक्टोबर 2026 !

October 1, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 30 सप्टेंबर 2026 !

September 30, 2026
जळगाव

मतदार यादी पुनरीक्षणाबाबत राजकीय पक्षांसोबत बैठक

September 29, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 29 सप्टेंबर 2026 !

September 29, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 28 सप्टेंबर 2026 !

September 28, 2026
सामाजिक

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 27 सप्टेंबर ते 03 ऑक्टोंबर 2026 !

September 27, 2026
Next Post

'मविप्र'च्या स्वीकृत संचालकपदी अॅड. कुणाल पवार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

सायगाव बंधाऱ्यात बैलगाडी पलटी होऊन दोघा तरुणांचा मृत्यू

July 8, 2021

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंतीनिमित्त महापौर आणि उपमहापौर यांनी केले अभिवादन !

April 30, 2021

जळगाव जि.प. अनुकंप पदभरती ; ३१ डिसेंबरपर्यंत १०० जणांची भरती होणार !

December 22, 2021

Free Local Hook Ups Free Local Hook Up Site

November 2, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group