पाळधी ता. धरणगाव (प्रतिनिधी) माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांची जळगाव ग्रामीण मतदारसंघात विविध गावांना भेटी दिल्यात.
प्रतापराव पाटील यांनी गंगापुरी, पष्टाणे, दहीदुल्ले, एकलग्न,चिंचपुरा,फुलपाट, म्हसावद, बोरणार, जळके, विटनेर, वडली येथे द्वारदर्शन तर सोनवद व चमगाव येथे रस्त्याचे भूमिपूजन केले. रामदेववाडी येथे जय सेवालाल मंदिरात आणि सुभाषवाडी येथे आरती केली. कवठळ आणि त्रिमूर्ती कॉलेज येथे गणेश उत्सव निमित्ताने आरती केली. विटनेर तांडा येथे शंकर भगवान मूर्तीची पूजा केली. यावेळी सर्व गावांतील जेष्ठ नागरीक शिवसेना युवासेना पदाधिकारी कार्यकर्ते ,ग्रामपंचायत सदस्य ,सरपंच, उपसरपंच, विविध विकास सोसायटी सदस्य चेअरमन उपस्थित होते.