धरणगाव (प्रतिनिधी) पालकमंत्री व पाणी पुरवठा मंत्री गुलाबरावजी पाटील यांचे चिरंजीव तथा माजी जि.प.सदस्य प्रतापराव पाटील यांनी धरणगाव भाजप कार्यालयास नुकतीच सदिच्छा भेट दिली.
शुक्रवारी जि.प.सदस्य प्रतापराव पाटील यांनी धरणगाव भाजप कार्यालयास नुकतीच सदिच्छा भेट दिली. यावेळी पंडीत दीनदयाल उपाध्याय यांचे पुस्तक देऊन त्यांचे स्वागत भाजपचे शहराध्यक्ष दिलीप महाजन व गटनेते कैलास माळी सर यांनी केले. याप्रसंगी माजी नगरसेवक विलास महाजन, भालचंद्र माळी,चंदन पाटील, सचिन पाटील, कन्हैया रायपूरकर, जयेश महाजन, विकास चव्हाण यांच्यासह भाजप-शिवसेना युतीचे आदि पदाधिकारी उपस्थित होते.