धरणगाव (प्रतिनिधी) माजी खासदार ए.टी.नाना पाटील यांनी धरणगाव भाजप कार्यालयास नुकतीच सदिच्छा भेट दिली.
यावेळी त्यांचे स्वागत करतांना भाजप नेते शिरीषआप्पा बयस, ओबीसी जिल्हाध्यक्ष अँड.संजय महाजन, तालुकाध्यक्ष जिजाबराव पाटील, अँड.वसंतराव भोलाने, शेखर पाटील, प्रकाश सोनवणे, ओबीसी तालुकाध्यक्ष सुनील चौधरी, शहराध्यक्ष दिलीप महाजन, रावा महाजन, टोनी महाजन, राजू पाटील, कन्हैया रायपूरकर, शरद भोई, जुलाल भोई, सचिन पाटील, विकास चव्हाण, इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.