नशिराबाद (सुनील महाजन) येथील राष्ट्रवादीचे माजी सरपंच विकासभाऊ पाटील यांच्यासमवेत ग्रामपंचायत सदस्यांनी आज पालकमंत्री नामदार गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.
जळगावातील शासकीय अजिंठा विश्राम गृह येथे पालकमंत्री नामदार गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत नशिराबाद येथील राष्ट्रवादीचे कार्यकर्त्यांनी आज सकाळी शिवसेनेत प्रवेश केला. यात प्रामुख्याने नशिराबाद येथील माजी सरपंच विकास भाऊ पाटील यांच्यासमवेत ग्रामपंचायत सदस्यांचा समावेश आहे. नशिराबाद नगरपरिषद निवडणुकीच्या दृष्टीने राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत. तशातच आज राष्ट्रवादीला जोरदार झटका बसला. आज सकाळी अजिंठा विश्रामगृह येथे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक घेण्यात आली. यावेळी नशिराबाद शिवसेनेचे शहराध्यक्ष विकास धनगर यांच्या उपस्थितीत नशिराबाद राष्ट्रवादीचे माजी सरपंच विकास पाटील, माजी ग्रामपंचायत सदस्य प्रकाश महाजन, आबा पाटील, पराग देवरे, युसुफ शोख (भंगारवाले), मनोज माळी, महेश पाटील, किरण पाटील, सत्तार शेख, संजय महाराज, सुपडु चौधरी अन्य जणांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी शहराध्यक्ष विकास धनगर दगडू काका माळी विनायक धर्माधिकारी बापू चौधरी शिवसेना जिल्हाप्रमुख चेतन भराटे बापू चौधरी कैलास निरखत विजय वाणी प्रभाकर महाजन यांच्यासह सर्व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान, यावेळी नशिराबाद नगरपरिषद निवडणूकीच्या संदर्भात महत्वपूर्ण चर्चा झाल्याचे देखील कळते.