जळगाव (प्रतिनिधी) छत्रपती शिवरायांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन आदर्श हिंदुत्वाचे कार्य करणाऱ्या हिंदू राष्ट्र सेनेचे संस्थापक अध्यक्ष हिंदूतेजसूर्य धनंजय भाई देसाई यांचे उद्या जळगाव येथे आगमन होणार आहे. ते सध्या उत्तर महाराष्ट्र च्या दौऱ्यावर आहेत.
धनंजय भाई देसाई हे २१ जानेवारीला शहरातील केमिस्ट भवन येथे सायंकाळी ५ ते ६० या वेळेत युवकांना भेटणार आहेत. तेथे आदर्श व्यक्तिमत्त्व, व्यसनमुक्ती तसेच भारतीय संस्कृतीचे श्रेष्ठत्व आदी विषयांवर ते यावेळी मनोगत व्यक्त करणार आहेत. जळगाव जिल्ह्यातील धर्मप्रेमी युवकांना बऱ्याच वर्षांनी धनंजय भाई देसाई यांचे विचार ऐकण्याची अमूल्य संधी यानिमित्त मिळणार आहे, तरी जिल्ह्यातील सर्व धर्मप्रेमी नागरिक, युवा वर्ग यांनी केमिस्ट भवन येथे उद्या दि २१ जानेवारी २०२१ वार गुरुवार सायंकाळी ५ वाजता उपस्थित राहावे असे आवाहन कार्यक्रमाचे आयोजक मोहन तिवारी यांनी केले आहे.