जळगाव (प्रतिनिधी) ग्रामपंचायत निवडणुकांचा निकाल लागल्यावर प्रतिस्पर्धी उमेदवाराच्या नातेवाईकाशी वाद घालून हाणामारी झाली होती. या प्रकरणी एमआयडीसी पेलिसांत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. उमाळा हाणामारीत चौघांना अटक करून जिल्हा न्यायालयात हजर केले. एक दिवसाच्या पोलीस कोठडीनंतर आज न्या. सुवर्णा पाटिल यांच्या न्यायालयाने संशयीतांचा जामीन अर्ज फेटाळून लावत चौघांची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.
याबाबत माहिती अशी कि, भिमराव झिपरु पाटिल (वय-५६) यांनी दिलेल्या तक्रारीवरुन एमआयडीसी पेलिसांत आठ संशयीतांच्या विरुद्ध प्राणघातक हल्ला, मारहाण व जीवे ठार मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी दाखल गुन्ह्यात फरार संशयीत रघुनाथ साहेबराव चव्हाण (वय-४३), भगवान साहेबराव चव्हाण(वय-४०), प्रकाश साहेबराव चव्हाण (वय-४७), शेखर नाना पाटिल (वय-२८) या संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच चौघांना पोलिस निरीक्षक प्रताप शिकारे यांच्या पथकातील सहाय्यक निरीक्षक अमोल मोरे, उपनिरीक्षक रामकृष्ण पाटिल, अतुल वंजारी, रतिलाल पवार, सुधीर साळवे,सचिन पाटील अशांच्या पथकाने चौघांना अटक करुन जिल्हा न्यायालयात हजर केले. एक दिवसाच्या पेलिस कोठडीनंतर आज न्या. सुवर्णा पाटिल यांच्या न्यायालयाने संशयीतांचा जामीन अर्ज फेटाळून लावत चौघांची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. सरकारपक्षातर्फे ॲड. प्रिया मेढे पुढील कामकाज पाहत आहेत.