पारोळा (प्रतिनिधी) तालुक्यातील विचखेडे शिवारात असलेल्या एका जिनिंगमध्ये बाल कामगार मुलीचे मशनरीमध्ये अडकून चार बोटे अडकून तुटल्याची घटना घडली. याप्रकरणी जीन मालकाविरुद्ध व व्यवस्थापनाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तालुक्यातील विचखेडे येथे असलेल्या व्यंकटेश कोटेक्स जिनिंगमध्ये दि. २ जून रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास चांदणी विजय गांगुर्डे (वय – १७) रा. चिरालपुरा ता. भिकणगाव जि. खरगोन (मद्य प्रदेश) ही बाल कामगार जिनिंगमध्ये मशनरी जवळ कापसाचे कवळयांमधील सरकी काढत असतांना अचानक मशिनमध्ये बोट सापडल्याने डाव्या हाताची चारही बोटे तुटून रक्तबंब झाली होती. त्यामुळे मुलीच्या कुटुबियांनी जिनिंगमध्ये झालेल्या घटनेमुळे दवाखान्यातील खर्च मागण्यासाठी बाजार समिती संचालक तथा जिनिंग मालक अनिल पुंडलिक मालपुरे यांच्याकडे गेले असता काहीच खर्च मिळणार नाही, तुम्हाला जे करायचे आहे ते करून घ्या असे उत्तर दिले. त्यामुळे याप्रकरणी पारोळा पोलीस स्टेशनला मुलीचे वडील विजय नानकिया गांगुर्डे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जिनिंग मालक, व प्रशासनाविरुद्ध बालकामगार कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.